- अमित भट, editor@esakal.com
दक्षिण कोरिया म्हटले, की पहिले डोळ्यासमोर येतात गंगनाम स्टाइल गाणे, बी टी एस, K POP, K Drama. मात्र, दक्षिण कोरिया भारतीयांसाठी जपानप्रमाणेच एक पर्यटन स्थळ देखील होऊ शकते. फार कमी भारतीय या देशाला पर्यटन स्थळ म्हणून भेट देतात. जगभरातील पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. या देशातील दोन प्रमुख शहरे सोल आणि बुसानला तुम्ही भेट देऊ शकता. त्याचबरोबर आणखीही बरीच पर्यटन स्थळे या देशात आहेत. काही अशाच रंजक आणि जरूर भेट द्यावी अशा स्थळांची माहिती आपण घेऊयात...