लेखनाची प्रेरणा सर्वसामान्य माणूस : भारत सासणे

तीन वर्षांपासून महामंडळाने घटनादुरुस्ती करून सन्मानपूर्वक निवडीचे धोरण अवलंबिले
भारत सासणे
भारत सासणेsakal

‘‘सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मी लिहितो. त्याच्या अस्तित्वाच्या लढाया, संघर्ष याचे पडसाद लेखनात उमटणे मला महत्त्वाचे वाटते,’ असे मत उदगीर येथे होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे(95 akhil bhartiy marathi sahitya samelan) नियोजित अध्यक्ष भारत सासणे(bharat sasne) यांनी ‘सकाळ’ला(sakal) दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

मुलाखतः आशीष तागडे

प्रश्न : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत काय सांगाल?

सासणे : काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण निवडणूक पद्धत अवलंबलेली होती. महामंडळाने तयार केलेल्या यादीतील मतदार इच्छुक उमेदवारांना मते देत. या सर्व प्रक्रियेत सुप्त स्पर्धा, कटुता, राजकारण, प्रदेशकारण दडलेले होते. त्यामुळे निवडणुकीत अनावश्यक वातावरणनिर्मिती होत होती. गेल्या तीन वर्षांपासून महामंडळाने घटनादुरुस्ती करून सन्मानपूर्वक निवडीचे धोरण अवलंबिले. हे करताना त्यांनी विवेक आणि गुणवत्ता या बाबींना महत्त्व दिले जावे, अशी चर्चा अधोरेखित केली. त्यामुळे चांगला संदेश वाचकांपर्यंत पोचला. त्यातून गुणवत्ताधारक साहित्यिकांची अध्यक्षपदासाठी निवड होईल, असे आश्वासन वाचकांच्या मनापर्यंत पोचले. या नव्या पद्धतीत काही संदिग्धता आहेच. ती घालविण्यासाठी स्पष्ट नियमावली करण्यात यावी, अशी चर्चा महामंडळांतर्गत पदाधिकाऱ्यांत आहे. तथापि जी नवीन पद्धत अवलंबवली त्यातून अनावश्यक स्पर्धा, शह-काटशह, राजकारण आदी अनिष्ट बाबी दूर झाल्या. एकमताने निवड झाली याचा आनंद आहे.

भारत सासणे
...तोपर्यंत नितेश राणेंना अटक नाही, न्यायालयाचा मोठा दिलासा

प्रश्न : आपल्यातील ‘अधिकारी’ आणि ‘साहित्यिक’ यांच्यात द्वंव्द झाले का? ते तुम्ही कसे हाताळले?

सासणे : मी लेखकाबरोबर प्रशासकीय अधिकारी होतो. (आता निवृत्त झाल्यामुळे होतो म्हणालो.) मात्र, एकाच वेळी दोन्ही भूमिका पार पाडताना कोणी कोणावर मात केली, हा झगडा कायम मनात वसत आलेला आहे. तथापि दोन्ही अनुभव परस्परपूरक ठरू शकतात, हा माझा अनुभव आहे. प्रशासनातील शिस्त लेखनात आणणे आणि साहित्यातील करुणा आणि विवेक प्रशासनात आणणे, या बाबींमुळे मला सामान्य माणूस समजून घेता आला. त्यामुळे चांगला प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना मी माणूस जवळून पाहिला. त्याच्या सुख-दुःखांशी समरस झालो. नोकरी ही अशी खिडकी आहे, ज्यातून मानवी जीवन जवळून पाहता येत होते. अशा क्षेत्रात काम करताना विश्वकरुणा बाळगणारा लेखक प्रशासकीय अधिकाऱ्यावर मात करतो, असा अनुभव आहे. तरीही हा झगडा कायम निर्माण होतो आणि त्यासाठी स्वतःशीश लढाई लढावी लागत आहे.

प्रश्न: साहित्य प्रकारात ग्रामीण आणि शहरी हा भेद असावा का?

सासणे : प्रत्यक्ष शहरी आणि ग्रामीण साहित्यात कृत्रिम भेद आहेत. प्रत्यक्षात एकात्म असल्याने आणि सामान्य माणसाचे सुख-दुःख येथे आणि तिथेही सारखेच असल्याने आकलनात किंवा समजून घेताना फरक करण्याची गरज नसते. त्यातून माझे निरीक्षण असे की, जगभरातील भाषांतून लिहिली गेलेली प्रसिद्ध पुस्तके, कादंबऱ्या यांचे स्वरूप एक अर्थाने ग्रामीणच आहे. ज्या कादंबऱ्यांना आपण अभिजात म्हणतो अशा विश्वविख्यात कादंबऱ्यांचे स्मरण केल्यावर लक्षात येईल, की जीवनाची भव्यता, खोली आणि उंची मांडताना, शोधताना ग्रामीण आणि नागर असा भेद उरलेला नसतो. मराठीतही या कथित भेदाच्या पलीकडे जाऊन जीवनदर्शी अशी महाकादंबरी क्वचित दाखवली जाते. अशा कृत्रिम भेदाला मी महत्त्व देत नाही.

भारत सासणे
PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी

प्रश्न: आपणाला लेखनाचे बीज कोठून मिळते. लेखनामागची प्रेरणा काय?

सासणे : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मी लिहीत आलेलो आहे. त्याच्या अस्तित्वाच्या लढाया, त्याचे संघर्ष याचे पडसाद लेखनात उमटणे मला महत्त्वाचे वाटते. आणि म्हणून माझ्या लेखनाची प्रेरणा सर्वसामान्य माणूसच आहे. त्याला जीवनरस या मातीतून मिळतो, त्यामुळेच या मातीबाबत आस्था बाळगणारे लिखाण करत आलो.

प्रश्न: सध्याच्या काळात कथाबाह्य साहित्यप्रकार वाढीस लागला आहे, त्याबद्दल काय वाटते?

सासणे : कथा, कादंबरी आदींपेक्षा अन्य विषयाची पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत आहेत, असे आता वाटत आहे ते काही अंशी बरोबर आहे. परंतु, त्यामागचे कारण शोधावे लागेल. ज्या-ज्या वेळेस सर्वसामान्य माणसाला अस्वस्थ, असुरक्षित वाटले, त्यावेळेस तो मनोरंजनाकडे, क्वचित बुद्धिरंजनाकडे वळला, असे निरीक्षण सांगितले जाते. आताचा काळ संभ्रमाचा आहे. सर्वसामान्य माणूस एका अर्थाने संमोहित झालेला असल्याने त्याचा स्वाभाविक कल अन्य विषयांकडे झुकतो आहे. त्यामुळेच त्याला आकर्षित करणारी पुस्तके उपलब्ध होत असतील, तर ते मान्य केले पाहिजे. तथापि, एक थिअरी अशी मांडली जाते की उत्कृष्ट साहित्याची निर्मिती ‘अभाव अवस्थे’तच होत असते. अर्थात, आजच्या परिस्थितीत कथाबाह्य साहित्य ही बाब चिंतात्मक मानली पाहिजे.

भारत सासणे
भीषण अपघातानंतर पोलिसांच्या गाडीला आग; तिघांचा होरपळून मृत्यू

प्रश्न: अध्यक्ष म्हणून आपल्या वेगळ्या काय कल्पना आहेत?

सासणे : हे साहित्य संमेलन असल्याने येथे साहित्यविषयक चर्चाच घडावी, असे अपेक्षित असते. त्यामुळे परिसंवाद निवडीसाठी ते साहित्यविषयाशी संबंधित, सखोल आशयघन असेच असावेत, अशी माझी अपेक्षा राहील. त्याचबरोबरीने लेखकांना, सर्वच विचारवंतांना ग्रासणारा भयाचा संदर्भ चर्चिला जावा, अशी माझी अपेक्षा राहील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com