Premium|India Strategic Petroleum Reserve : ऊर्जा स्वावलंबनासाठी भारताची मोठी पाऊले; इराण युद्धाचे परिणाम

Global Oil Crisis 2026 : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक तेल बाजारात १०० डॉलर्सचा भडका उडाला असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी फोडण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी ऊर्जा स्रोतांचे बळकटीकरण ही काळाची गरज बनली आहे.
Global Oil Crisis 2026

Global Oil Crisis 2026

esakal

Updated on

कौस्तुभ केळकर- saptrang@esakal.com

इराणबरोबर सुरू असलेल्या युद्धाने साऱ्या जगाला ऊर्जा संकटात टाकले आहे. आपल्या देशाला तर त्याची मोठी झळ बसली आहे. ऊर्जा ही अर्थव्यवस्थेची रक्तवाहिनी आहे. जोपर्यंत आपण ऊर्जेसाठी आखाती देशांवर अवलंबून आहोत, तोपर्यंत आपले आर्थिक स्थैर्य हे जागतिक राजकारणाच्या लहरीवर अवलंबून असेल. आपण घराघरात ऊर्जा बचत करणे आणि स्वदेशी ऊर्जेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

देशाला २०४७ पर्यंत ''विकसित भारत'' बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक महासत्ता होणे आवश्यक आहे. मात्र, या प्रवासात ‘ऊर्जा सुरक्षा’ हा सर्वांत मोठा अडथळा ठरू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणबरोबरचे युद्ध संपण्यासंदर्भात उलटसुलट विधाने करत असले, तरीही हा संघर्ष संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. इराणही ईर्षेला पेटला असून तो जोरदार प्रतिहल्ले करत आहे. जागतिक अर्थव्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील प्रत्येक हालचाल तेलाच्या किमतीत प्रतिबिंबित होते. साहजिकच गेले काही महिने ६० ते ७० डॉलर्स प्रति बॅरल या पट्ट्यामध्ये असलेल्या कच्च्या तेलाच्या दरामध्ये प्रचंड चढ-उतार होत असून, आता हा दर १०० डॉलर्स प्रति बॅरेलच्या पातळीवर पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com