

Ancient Indian weapons and armor
Sakal
काही शस्त्रास्त्रे जोडीने वापरली जातात. इतकी की, एकमेकांशिवाय त्यांची कल्पनाच काय, नावंसुद्धा लिहिली जात नाहीत! तोफ-गोळे, धनुष्य-बाण... आणि अशीच आहे आणखी एक जोडगोळी, ती म्हणजे - तलवारीची सखी, ‘ढाल’! युद्धांमध्ये ढालीशिवाय तलवारीची कल्पनासुद्धा करता येणार नाही इतकी ढाल तलवारीसोबत जोडली गेली आहे. ढालीचा समावेश तसा ‘संरक्षक आयुध’ या गटात केला जातो. ढालीचं प्रयोजनही तसंच आहे. ते म्हणजे - युद्धात, द्वंद्वात डोके, मान आणि पोट या नाजूक अवयवांचं रक्षण करणं.