- श्रीकांत इंगळहळ्ळीकर, saptrang@esakal.com
असंख्य उपनद्या मिळालेली गंगा उत्तर भारताची जीवनदायिनी आहे. हिमालयात उगम पावणारी ही नदी हरिद्वारला तुलनेने शांत होते. तिचा प्रवाह आश्वस्त करणारा असतो. गंगेकाठची आरती देखील भारावणारी असते. जीवनादायिनी गंगा प्रदूषित होणार नाही याची जबाबदारी आपली आहे. प्रदूषण असेच वाढत राहिले तर गंगेच्या अस्तित्वालाच धोका पोहोचेल.