pt usha and bhaichung bhutia
sakal
- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com
भारतामध्ये ऑलिंपिक या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याआधी भारतातील क्रीडाक्षेत्रातील अंतर्गत वाद, भ्रष्टाचार व कामकाजात पारदर्शकता, यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पुढाकार घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याला अंशत: मान्यताही देण्यात आली आहे.
त्यानुसार आता राष्ट्रीय क्रीडा संघटनांमध्ये ऑलिंपिक स्पर्धांमधील सहभाग व पदक विजेत्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंनाही स्थान देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक पावलामुळे आगामी काळात भारतामध्ये मैदानाबाहेरही खेळाडूंच्या मतांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही बाब सुखावणारी ठरली आहे.