

By Design Works Thoughts Sudhakar Nadkarni
esakal
डॉ. प्रदीप पेंडसे - saptarang@esakal.com
बाय डिझाईन : वर्क्स+थॉट्स हा ‘डिझाइन गुरू’ प्रा. सुधाकर नाडकर्णी यांचा शैक्षणिक-व्यावसायिक प्रवास, त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य व त्यामागील तत्त्वविचार मांडणारा ग्रंथ आहे. एवढेच नव्हे, तर भारतात ‘इंडस्ट्रियल डिझाइन’ हा विषय रुजवणाऱ्या, जोपासणाऱ्या, त्याला शिक्षणप्रणाली आणि कार्यक्षेत्रात विकसित करत नेण्याच्या त्यांच्या मोलाच्या भूमिकेचा वृत्तांत करणारा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
‘डिझाइन’ ही समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणारी एक प्रगल्भ विचारप्रणाली आहे हे तत्त्व रुजवण्यासाठी नाडकर्णी सरांनी यांनी जवळपास सहा दशके अथक प्रयत्न केले आहेत. आपल्या प्रेरणादायी प्रवासातले सर्व सहकारी, मित्र आणि मार्गदर्शकांना त्यांनी पुस्तकातही जे श्रेय व स्थान दिले आहे, त्या स्पर्शामुळे मूलतः गंभीर प्रकृतीच्या या दस्तावेजाला एक रसरशीत जिवंतपणा प्राप्त झाला आहे .