Kalali language
sakal
सप्तरंग
भावव्यंजक बोली!
कलाली बोली ही महाराष्ट्र व मध्यप्रदेशात बोलली जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची बोली आहे. या बोलीतील लोकगीते, म्हणी, रिती-रिवाज आणि शब्दरचना या आपल्या समाजाच्या इतिहासाशी जोडलेल्या आहेत.
डॉ. रामदास चवरे- editor@esakal.com
आपल्या खंडप्राय देशात अनेक भाषांची दयनीय अवस्था पाहिली, की मन व्यथित होते. एक भाषा मरते, तेव्हा एक इतिहास नष्ट होतो. ‘कलाली’ भाषेची आज तीच अवस्था आहे. परंतु या भाषेची आपली अशी वेगळी गोडी आहे. बोलींचे सौंदर्य आजच्या माणसापर्यंत पोहोचले, तर त्याविषयी कुतूहल निर्माण होईल असे वाटते. हे कुतूहल मागे पडणाऱ्या बोलीभाषांना पुनरुज्जीवित करायला उपयोगी पडेल.