
Book review:
esakal
खूप वर्षांपूर्वी एका गाजलेल्या मालिकेसंदर्भात हे घडले होते. दूरचित्रवाणीवरच्या एका मालिकेत म्हणजे नेमकं सांगायचं तर ‘मिर्झा गालिब’ या मालिकेत गालिबची भूमिका साकारणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांना एक लेखिका सुमिता देशमुख यांनी ‘दीवान-ए-गालिब’ हे आपले पुस्तक भेट दिले आणि त्यावर लिहिले होते, ‘‘मिर्झा गालिब या मालिकेत गालिबची व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या महान कलाकाराला आदरपूर्वक अर्पण.’’
काही काळानंतर हेच पुस्तक हिंदी भाषेतील कवी बोधिसत्त्व यांना मुंबईत विलेपार्ले स्टेशनसमोरच्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात मिळाले. यावरून एका बाब पक्की आहे, की नसीरुद्दीन शाह किंवा त्यांच्या घरच्यांपैकी, कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही हे पुस्तक जपून ठेवावे असे वाटले नाही आणि त्यांच्याकडून ते पुस्तक रद्दीत टाकले गेले. एक शक्यता अशी, की त्यांनी हे पुस्तक कोणाला तरी दिले असेल आणि त्या व्यक्तीमार्फत ते पुस्तक रद्दीच्या दुकानापर्यंत पोहोचले असेल. काहीही असो, सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटले गेले की ‘‘नसीरुद्दीन शाह यांनी या पुस्तकाचा अपमान केला का?’’