अब्दुल कलाम यांचे अजरामर Quotes

अब्दुल कलाम यांचे अजरामर Quotes

कायम तुमच्या कामावर प्रेम करा, कंपनीवर नव्हे. कारण, कंपनी तुमच्यावरील प्रेम केव्हा कमी करेल, हे तुम्ही सांगू शकत नाही.
------------------------------------------------
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही. परंतु सवयी बदलू शकता आणि मला खात्री आहे, तुम्ही सवयी बदलल्यास तुमचे भवितव्य नक्कीच बदलेल.
------------------------------------------------
तुम्ही झोपेत असताना पाहतात ती स्वप्ने नाहीत. जे तुम्हाला झोपू देत नाही, तीच खरी स्वप्ने.
------------------------------------------------
जीवन आणि वेळ हे जगातील उत्तम शिक्षक आहेत. वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे जीवन शिकविते आणि जीवनाचे मूल्य वेळ शिकविते.
------------------------------------------------
अपयशासारख्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आत्मविश्‍वास आणि परिश्रमाशिवाय दुसरे चांगले औषध नाही. 
------------------------------------------------
एखाद्या व्यक्तीला जिंकणे, त्याचा पराभव करण्यापेक्षा खूप अवघड आहे.
------------------------------------------------
यशोगाथा वाचू नका, त्यातून केवळ संदेश मिळतो. कायम अपयशाच्या कथा वाचा, त्यातून यश मिळविण्यासाठी नवनवीन संकल्पना मिळतात.
------------------------------------------------
तुमची शेवटची चूक ही तुमची उत्तम शिक्षक असते.
------------------------------------------------
कधीतरी वर्गातील तास बुडवून मित्रांबरोबरचा आनंद जरूर घ्या. मी जेव्हा मागे वळून पाहतो, त्या वेळी लक्षात आले की गुणांमुळे नव्हे, तर मित्रांच्या आठवणींनी माझ्या चेहऱ्यावर हसू निर्माण होते.
------------------------------------------------
प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेल्या गोष्टीच वाट पाहणाऱ्यांना मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com