
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
‘तिरुपती’ डोसाचा मेन्यू इतका मोठा आहे, की रोज एक प्रकार खाल्ला तर मेन्यू संपवायला निदान सहा महिने निघून जातील. साधा, मसाला, चायनीज, तिरुपती स्पेशल, स्पेशल डोसा, उत्तप्पा याअंतर्गत डोशांचे वर्गीकरण केलेले आहे. चीज, बटर, पनीर याव्यतिरिक्त वेगवेगळ्या घटक पदार्थांचे कॉम्बिनेशन केलेले डोसे फक्त नावाने नाही तर चवीलाही तितकेच वेगळे आहेत.