

US foreign policy shift
esakal
शीतयुद्धानंतर जगाकडं पाहण्याच्या अमेरिकी दृष्टिकोनात मूलभूत बदल करणारा दस्तऐवज म्हणून ताज्या अमेरिकी सुरक्षा धोरणाकडं पाहिलं जाईल. ज्या देशात ज्या प्रकारची राज्यव्यवस्था आणि ज्या प्रकारचे सत्ताधीश असतील, त्यांच्याशी अमेरिकी हितसंबंध जपले जातील, अशा रीतीनं व्यवहाराची हमी हे धोरण देतं. हे नवे धोरण रशियाला अमेरिकेचा शत्रू सोडा, स्पर्धकही मानत नाही. चीनकडं आर्थिक आघाडीवरचा स्पर्धक म्हणूनच पाहतं आणि युरोप-अमेरिका संबंध उलटेपालटे करण्याचे संकेत देतं.