इंडियन ऑईलमध्ये नोकरीच्या संधी; कोणतेही शुल्क नाही

JOB
JOB

इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या पेट्रोलियम कंपन्यांतील अग्रेसर कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध असून, यासाठी कोणतेही शुल्क देण्याचीही गरज नाही. 

आयओसीएलमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी तब्बल 64 जागा निघाल्या आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 असणे आवश्यक आहेत. या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच त्याला दर महिना 25 हजार इतके वेतन दिले जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही विद्यापीठातील मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा 3 वर्षांचा डिप्लोमा ही आहे.

उमेदवाराचे वय 31-5-2019 पर्यंत 18 ते 24 दरम्यान असणे गरजेचे आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारिख 24 जून 2019 ही असून, https://www.iocl.com या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध आहेत. लेखी परिक्षेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com