अशी बोलते माझी कविता (वसंत शिंदे)

वसंत शिंदे, सातारा (९८२२६५३५८२)
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

...गाव हरवला आहे

कौलांनी शाकरलेला गाव हरवला आहे
गोठ्यांनी गजबजलेला गाव हरवला आहे

ती कुठे शिवारे गेली? ती गुरे कुठे हंबरती...?
घुंगरांनी नादवलेला गाव हरवला आहे

पक्‍क्‍या सडकांमध्ये हरवल्या धुळीच्या वाटा
वनराईने नटलेला गाव हरवला आहे

आता न साद राघूची मैनेसाठी येई
आमराईत मोहरलेला गाव हरवला आहे

ओढ्याचे अवखळ पाणी गुणगुणणेच विसरले
पाटातुन खळखळलेला गाव हरवला आहे

चिमण्यांची शाळा जेथे रांगेत भरे पूर्वी
त्या तारेवर झुललेला गाव हरवला आहे

...गाव हरवला आहे

कौलांनी शाकरलेला गाव हरवला आहे
गोठ्यांनी गजबजलेला गाव हरवला आहे

ती कुठे शिवारे गेली? ती गुरे कुठे हंबरती...?
घुंगरांनी नादवलेला गाव हरवला आहे

पक्‍क्‍या सडकांमध्ये हरवल्या धुळीच्या वाटा
वनराईने नटलेला गाव हरवला आहे

आता न साद राघूची मैनेसाठी येई
आमराईत मोहरलेला गाव हरवला आहे

ओढ्याचे अवखळ पाणी गुणगुणणेच विसरले
पाटातुन खळखळलेला गाव हरवला आहे

चिमण्यांची शाळा जेथे रांगेत भरे पूर्वी
त्या तारेवर झुललेला गाव हरवला आहे

शहरांनी टापांखाली चिरडली अशी ही गावे
माळावर विसावलेला गाव हरवला आहे

नातवास निजण्यापूर्वी गोष्ट हवी ‘हॅरी’ची   
आजीने जोजवलेला गाव हरवला आहे

त्या पिंपळवृक्षाखाली रंगायाच्या गप्पा
पारावरती बसलेला गाव हरवला आहे

Web Title: vasant shinde's poem in saptarang