अशी बोलते माझी कविता (विनायक अनिखिंडी)

विनायक अनिखिंडी, ९९२२९७०३१७
रविवार, 7 मे 2017

शून्य!
शून्याचं मोल खरंच फार असतं !
सगळ्या जगाचं मातृत्व
शून्यामध्येच दिसतं...

    पहिल्या आकड्यानंतर
    शून्यच खेळ करतो
    कशालाही गुणा याला
    शेवटी शून्यच उरतो

शून्यात विलीन झाल्यावरच
खरा मोक्ष मिळतो
शून्यात नजर लावून बसता
काही अर्थ गवसू लागतो

    शून्य तसा हुशार...
    फार कसलेला
    गरिबाच्या खिशात
    नि
    श्रीमंताच्या हृदयात
    सदा वसलेला!

शून्याची किंमत काय असते?
फक्त शून्य
झाला शेवटी सज्ज
तर कोटींचेही अब्ज!

शून्य!
शून्याचं मोल खरंच फार असतं !
सगळ्या जगाचं मातृत्व
शून्यामध्येच दिसतं...

    पहिल्या आकड्यानंतर
    शून्यच खेळ करतो
    कशालाही गुणा याला
    शेवटी शून्यच उरतो

शून्यात विलीन झाल्यावरच
खरा मोक्ष मिळतो
शून्यात नजर लावून बसता
काही अर्थ गवसू लागतो

    शून्य तसा हुशार...
    फार कसलेला
    गरिबाच्या खिशात
    नि
    श्रीमंताच्या हृदयात
    सदा वसलेला!

शून्याची किंमत काय असते?
फक्त शून्य
झाला शेवटी सज्ज
तर कोटींचेही अब्ज!

    असा अमूल्य ‘शून्य’
    भारतानं जगाला दिला
    तेव्हा कुठं जग निघालं
    प्रगतीच्या वाटेला!

Web Title: vinayak anikhindi's poem in saptarang