

Vishwajit More: The New Wrestling Star from Kolhapur
Sakal
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथील १९५२मधील ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत इतिहास रचला; मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या एकाही कुस्तीपटूला ऑलिंपिकमध्ये पदक पटकावता आलेले नाही. कोल्हापूरच्या २१ वर्षीय विश्वजीत मोरे या मराठमोळ्या पठ्ठ्याने सर्बिया येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील २३ वर्षांखालील गटामध्ये ब्राँझपदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकवला. विश्वजीत मोरे याला आता लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये पदक पटकावण्याचा ध्यास लागला आहे. यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.