दक्षिणेसाठी पत्नीची व पुत्राची विक्री

मार्कंडेय पुराणातील हरिश्चंद्राची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. विश्वामित्रांची दक्षिणा देण्यास हरिश्चंद्राकडं अजूनही अर्धा दिवस शिल्लक असतो, इथपर्यंतचा कथाभाग आपण मागील सदरात पाहिला.
Sale of wife and son for Brahman Dakshina
Sale of wife and son for Brahman Dakshinasakal

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

मार्कंडेय पुराणातील हरिश्चंद्राची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. विश्वामित्रांची दक्षिणा देण्यास हरिश्चंद्राकडं अजूनही अर्धा दिवस शिल्लक असतो, इथपर्यंतचा कथाभाग आपण मागील सदरात पाहिला. हरिश्चंद्र चिंतेत पडतो : ‘मान्य केलेली दक्षिणा मी कशी देऊ? मला कोणी श्रीमंत मित्र आहेत का? मला या क्षणी धन कोठून मिळू शकेल? मी आत्महत्या करावी का? त्यापेक्षा मी मलाच विकून टाकणे अधिक योग्य ठरेल.’

त्यावर त्याची पत्नी शैब्या म्हणाली, ‘हे महान राजा! असे विचार मनातून काढून टाक आणि तुम्ही स्वतःहून दिलेल्या वचनाचे पालन कर. दिलेल्या वचनाचं निश्चयपूर्वक पालन करणं हाच खरा पुरुषार्थ आहे, यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. दिलेलं वचन खोटं ठरलं, तर त्याचं अग्निहोत्र कर्म, ज्ञान, दान, पुण्य कर्म आणि इतर सर्व काही निष्फळ ठरते. हे राजन, सात अश्वमेध यज्ञ करण्याव्यतिरिक्त तू राजसूय यज्ञही केलेला आहेस.

केवळ एक वचन पाळलं नाहीस, तर तुला या सर्वांच्या कर्मफलावर आणि स्वर्गावर पाणी सोडावं लागेल, हे तुला मान्य आहे का? मी एक पुत्र जन्माला घातला आहे. पुत्रप्राप्तीसाठीच पत्नीची कामना केली जाते. तू मला विक आणि संपत्ती मिळव. ती संपत्ती दक्षिणा म्हणून ब्राह्मणाला दे.’

तिचे हे शब्द ऐकल्यावर हरिश्चंद्राचं दुःखानं भान हरपलं. शुद्धीवर आल्यावर तो विलाप करू लागला. ‘तुझ्या बोलण्यानं मला अतीव दुःख झाले आहे. मी इतका पापी आहे का? तू असं का बोललीस? माझा धिक्कार असो!’ पुन्हा एकदा बेशुद्ध होऊन तो जमिनीवर कोसळला. राजा हरिश्चंद्राला असं जमिनीवर पडलेलं पाहून शैब्या दुःखात बुडाली. तिचीही शुद्ध हरपली आणि ती कोसळली. हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्यांचा पुत्र रोहिताश्व एकटा पडला. त्यानं आपल्या माता-पित्याला जमिनीवर पडलेलं पाहिलं. प्रचंड भुकेमुळं तो आकांत करू लागला.

याच वेळी विश्वामित्र तिथं येऊन पोहोचले. आपली दक्षिणा घेण्यासाठी ते आले असताना समोरचं दृश्य पाहून ते संतप्त झाले. हरिश्चंद्राला बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेलं त्यांनी पाहिलं. त्याच्या तोंडावर पाण्याचा शिपकारा मारून त्यांनी राजाला शुद्धीवर आणलं आणि म्हणाले, ‘हे राजेन्द्रा, उठ! मला माझी दक्षिणा दे.’

राजाच्या चेहऱ्यावर शिंपडलेलं पाणी बर्फासारखं थंड होतं, त्यामुळं तो खाडकन शुद्धीवर आला. मात्र, विश्वामित्रांना समोर पाहून तो पुन्हा बेशुद्ध पडला. हे सर्व पाहून ऋषींच्या तळपायाची आग मस्तकात गेली, अपमानाच्या भावनेनं त्यांचं अंग थरथरू लागलं. त्या ऋषींनी राजाला पुन्हा शुद्धीवर आणत जाब विचारला.

ते म्हणाले, ‘धर्मपालन करण्याची तुझी इच्छा असेल, तर मला माझी दक्षिणा दे. सत्याचाच आधार घेत सूर्य सर्वांना उष्णता पुरवितो. पृथ्वीचं अस्तित्वही सत्याच्याच आधारावर आहे. सत्य हाच परमोच्च धर्म असल्याचे मानलं जाते. स्वर्गाची स्थापनाही सत्यातच झालेली आहे. (आपल्यापैकी बहुतेकांनी ही वाक्ये सुभाषितांमध्ये ऐकली असतील.) ज्या वेळी एका पारड्यात सत्य आणि दुसऱ्या पारड्यात एक हजार अश्वमेध यज्ञांचं पुण्य ठेवून त्यांची तुला केली जाईल, त्या वेळी सत्याचंच पारडं खाली जाईल. तू एक सामर्थ्यवान राजा असूनही दुष्ट प्रवृत्तीचा आहेस. हे राजा ! तू मला आजच, सूर्य अस्ताला जाण्याआधी माझी दक्षिणा दिली नाहीस, तर मी तुला निश्चितपणानं शाप देईन.’ हरिश्चंद्राला भयकंपित करून विश्वामित्र निघून गेले. राजाच्या पत्नीनं त्याच्याकडं पुन्हा विनवणी केली.

तो उत्तरला, ‘हे पुण्यवती! तुला विकून टाकण्याचं निष्ठुर कर्म मला करावं लागणार आहे.’ अत्यंत विमनस्क स्थितीत तो नगरात गेला. डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असताना आणि घसा दाटून आलेला असतानाही राजा म्हणाला, ‘हे नागरिकांनो, मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. मी कोण आहे, असे मला का विचारता? मी अत्यंत दुष्ट माणूस आहे.

नाही नाही, मी एक कठोर हृदयाचा राक्षस आहे. मी खरोखरच त्यापेक्षाही वाईट आहे. माझं आयुष्य तसेच ठेवून मी माझ्या प्रियतमेची विक्री करण्यास इथं आलो आहे. माझं तिच्यावर स्वतःपेक्षाही अधिक प्रेम आहे. कोणाला घरकामासाठी मोलकरीण हवी आहे काय? कृपया पटकन सांगा. मी केवळ संध्याकाळपर्यंतच तग धरू शकतो.'

त्याचे हे वाक्य ऐकून एक वयोवृद्ध ब्राह्मण पुढं आला आणि राजाला म्हणाला, ‘मला ही मोलकरीण दे. मी तिला खरेदी करतो आणि तुला संपत्ती देतो. माझ्याकडं पुष्कळ धन आहे. माझी पत्नी नाजूक आहे आणि घरकाम करण्याची शक्ती तिच्यात नाही. हिला मला सोपव, म्हणजे माझ्या पत्नीऐवजी ही काम करेल. तुझी बायको तरुण, सुंदर आणि सुशील आहे. तिला हे काम जमेल. या स्त्रीला मला सोपवून त्याबदल्यात योग्य त्या धनाचा स्वीकार कर.’

त्या ब्राह्मणाचं हे म्हणणे ऐकून राजा हरिश्चंद्राच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. तो धड उत्तरही देऊ शकला नाही. ब्राह्मणानं राजाजवळ असलेल्या काठीला धनाचे गाठोडं पक्कं बांधलं आणि राजाच्या पत्नीला केसांना धरून तो तिला ओढत नेऊ लागला. आपल्या आईला असं ओढत नेलं जात असताना पाहून रोहिताश्व रडायला लागला. आपल्या छोट्या हातांनी त्यानं तिचे कपडे पकडले. ती म्हणाली, ‘हे भल्या माणसा, मला सोड, जेणेकरून मी माझ्या पुत्राला एकदा नीट पाहून घेईन. पुत्रा, यानंतर मी तुला दिसणं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com