मुंबईचा वडापाव पुणेकरांचाही लाडका

Vada-Pav
Vada-Pav

वीकएंड हॉटेल - नेहा मुळे
वडा-पाव हा महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. सर्व सामाजिक पातळींवर वडा-पाव हा सर्वांचा आवडीचा स्नॅक आयटम आहे.

एकाच डिशमध्ये असलेले कॉन्ट्रास्ट टेक्सचर, त्यातून मिळणारी अविश्वसनीय चव आणि कमी किमतीत मिळणारा हा पदार्थ म्हणजे एक आयकॉनिक डिशच. गरमागरम तळलेला कुरकुरीत वडा कढईमधून बाहेर येतो. मऊसर पावावर चटणी टाकून त्यात हा वडा ठेवला जातो, तेव्हा हे दृश्य बघून तोंडाला पाणी सुटल नाही, तरच नवल! सोबत तळलेल्या मिरचीची लज्जत वेगळीच.

मुंबईकर अशोक वैद्य यांनी १९६६मध्ये वडा-पावचा शोध लावला, असं सांगितलं जातं. दादर स्टेशनजवळ सुरू झालेल्या या स्टॉलवर रोज शेकडो गिरणी कामगारांची रेलचेल असायची. कारण, कमी वेळात चवदार, जलद आणि स्वस्त मिळणारा हा खाद्यपदार्थ होता. अगदी कमी वेळातच मिळणाऱ्या वडा-पावला मुंबईकरांनी उचलून धरलं. काही वर्षात गिरणी कामगारांचे संप आणि आंदोलनानंतर गिरण्या बंद पडू लागल्या आणि अनेक माजी कामगारांनी शिवसेनेच्या पाठिंब्याने वडा-पाव स्टॉल्स व गाड्या सुरू केल्या. त्यानंतर वडा-पाव सर्वत्र प्रसिद्धीस येऊ लागला.

मुंबईत जरी वडा-पावचा जन्म झाला असला, तरी पुणेकरांच्या ही तो खास आवडीचा आहे. त्यातून पावसाळ्यात वडा-पाव खाण्याची मजा काही औरच. पाऊस पडल्यावर सर्व वडा-पाव गाड्यांवर गर्दी झालेली दिसते. आजकाल वडा-पावचे पण अनेक व्हर्जन व फ्लेवर्स पाहायला मिळतात. अगदी चीझ वडा-पावपासून ते चक्क बेकन वडा-पाव देखील मिळतो.

पुण्यात वडा-पावची ठिकठिकाणी गाळे, दुकाने, स्टॉल्स बघायला मिळतात. प्रत्येकाचा वडा-पाववाला ठरलेलाच असतो. पुण्यातील तरीही काही निवडक

ठिकाणं... 
  गार्डन वडा-पाव (अनेक शाखा) - पुण्यातला बेस्ट वडा-पाव म्हणून गार्डनची ओळख आहे. आकाराने प्रचंड मोठा असलेल्या या वडा-पावमध्ये त्यांच्या खास हिरव्या चटणीमुळे एक विशेष चव येते. सोबतच येणाऱ्या वड्याचा चुरा, कांदा आणि मिरचीची लज्जत वेगळीच.

  रोहित वडेवाले किंवा त्यांचाच असलेला ‘द वडा-पाव कॅफे’ (अनेक शाखा) - रोहित वडेवालेच्या वडा-पावची वेगळी ओळख करून द्यायला नको. अलीकडेच त्यांनी अनेक ठिकाणी वडा-पाव कॅफे सुरू केले आहेत. या ठिकाणी वेगवेगळे फ्लेवर्सच्या वडा-पावची चव चाखता येते. वड्यासोबतच पावाचेही हेल्दी ऑपशन्स इथे आहेत.  

  जोशी वडेवाले (अनेक शाखा) - जोशी वडेवालेचा अगदी गोलाकार वडा आणि त्यासोबत येणाऱ्या लाल चटणीमुळं अनेकांच्या आवडीचा.

  एस. कुमार वडेवाले (हडपसर आणि इतर शाखा) : एकदम मोठा वडा पाव आणि त्यासोबत येणारी शेंगदाणा चटणी, कांदा अशा या वडा-पावचे अनेक चाहते आहेत.

  अजंठा (लाल बहादूर शास्त्री रोड, सदाशिव पेठ) - उत्कृष्ट क्वालिटी आणि चवीचा वडा-पाव इथे मिळतो. गरमागरम वडा-पाव खाऊन झाल्यावर त्यांच्या थंडगार श्रीखंडाची चव नक्की चाखून पाहा.

  कोथरूड वडा पाव (डी. पी. रोड, कोथरूड) : थोडा झणझणीत असलेला हा वडा-पाव अनेक कोथरुडकरांच्या पसतीस उतरलाय.

  महाराजा वडा (कर्वेनगर) - अनेक प्रकारचे वडा-पाव इथे मिळतात. चीझी डीलाइट आणि मेक्सिकन लज्जत नक्की ट्राय करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com