राशीभविष्य : (२२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२०)

weekly horoscope
weekly horoscope

जाऊ या तुळशीच्या वऱ्हाडासंगे! 
कार्तिक महिन्याला आणि कार्तिक महिन्यातील चंद्रकलांना मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. या कलांना ‘श्रीविष्णूंचा प्रबोधोत्सव’च म्हटलं जातं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या एक प्रकारे चित्कलाच म्हटल्या पाहिजेत. या चित्कलांचं अवतरण किंवा या चित्कला विशिष्ट बोधातून नांदणं यांनाच अवतार म्हटलं जातं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक माणूस हा एक वृत्तीचाच अवतार म्हटला पाहिजे आणि हा अवतारसुद्धा उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांतूनच खेळत असतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांशीच संबंधित आहेत. ब्रह्मा ही उत्पत्ती आहे, विष्णू ही स्थिती आहे आणि महेश हा लय आहे. कार्तिक प्रतिपदा ते कार्तिक पौर्णिमा हा चंद्रकलांचा प्रवास हाही एक प्रबोधोत्सवच होय. अशी ही प्रतिपाद्याची प्रतिपदा कला परतत्त्वाचा स्पर्श घेऊन उगवते आणि पौर्णिमेला पूर्ण विकसित होऊन पूर्णबिंब होत पूर्णानुभूती घेत समर्पित होते! 

जीव ही एक परतत्त्वाची कला आहे. ही परतत्त्वाची कला पूर्णत्वास जाऊन पूर्ण बिंबात विलीन होणं हाही एक प्रबोधोत्सवच असतो. अर्थातच हा महाविष्णूचा प्रबोधोत्सव आहे आणि ही प्रबोधिनी एकादशी ही एक प्रचीतीची कला आहे आणि या प्रचीतीच्या कलेचं प्रबोधाशी विवाहबद्ध होणं हाच विवाहसमारंभ या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी तुलसीविवाह म्हणून साजरा केला जातो! 
हा सप्ताह पंढरपूरच्या यात्रेचा आहे. माणसाच्या जगण्यालाही जीवनयात्रा असं संबोधलं जातं. मात्र, सध्या माणसाच्या हृदयात तुलसीच्या प्रेमाचं वृंदावन जपलंच जात नाहीय. मित्र हो, मंदिरं खुली झाली आहेत, मग आता आपण डोक्‍यावर तुलशीवृंदावन घेऊन तुळशीच्या वऱ्हाडासंगे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरीला जाऊ या...आणि प्रबोधोत्सव साजरा करू या! 

व्यावसायिक वसुली होईल
मेष :
या सप्ताहात ग्रहांचं फील्ड शुक्र ताब्यात घेणार आहे, याचा तुम्हाला पूर्णपणे लाभ होईल. अश्र्विनी नक्षत्राच्या तरुणांना एक पॅकेज घोषित होईल. ता. २६ ते २९ हे दिवस चमत्कार घडवतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची प्रेमप्रकरणात प्रगती. व्यापाऱ्यांची व्यावसायिक वसुली. 

व्यावसायिक प्रलोभनं टाळा
वृषभ :
शनी-गुरू सहयोगामुळे कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात आश्र्वासक राहील. थोरा-मोठ्यांच्या ओळखीतून लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती मौज-मजा अनुभवतील. सुवार्ता कळतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक प्रलोभनं टाळावीत. बाकी, पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. 

नोकरीत मान-मरातब वाढेल
मिथुन :
शुक्रभ्रमणाचं एक पॅकेज अस्तित्वात राहील. विवाहेच्छूंना अतिशय अनुकूल सप्ताह. विवाहस्थळांचा भर वाढेल. संधी दवडू नका. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची चलती राहील. प्रत्येक ठिकाणी आगतस्वागत होईल. नोकरीत मान-मरातब वाढेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारणी व्यक्तींशी काळजीपूर्वक वागावं. 

मोठे प्रकल्प हाती घ्याल
कर्क :
शुक्रभ्रमण सप्ताहभर कलांनी समृद्ध होत जाईल. तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. मोठे प्रकल्प हाती घ्याल. काहींचे वास्तुविषयक व्यवहार होतील. ता. २६ ते २८ हे दिवस अतिशय शुभ. पुष्य नक्षत्राच्या आणि पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती चांगलाच लाभ उठवतील.  आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचं कोर्टप्रकरण मार्गी लागेल. 

परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय
सिंह :
हा सप्ताह तरुणांना मोठा बूस्टर डोस देणारा, ऑनलाईन क्‍लिक होणारा. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह अभूतपूर्वच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचे व्यावसायिक वाद संपतील. सप्ताहाचा शेवट अतिशय लाभदायक. मात्र, संसर्गजन्य बाधा होणार नाही याची काळजी घ्याच. 

व्यवसायातील मरगळ हटेल
कन्या :
हा सप्ताह शुभग्रहांच्या स्पंदनांचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक मरगळ पूर्णतः जाईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी-मध्यस्थीतून लाभ. ता. २५ व २६ या दिवशी महत्त्वाची कामं होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी हाता-पायाची काळजी घ्यावी. 

प्रेमप्रकरण मार्गी लागेल
तूळ :
स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचा दिवाळीचा आनंद पुढचे अनेक दिवस टिकेल. दिवाळी रेंगाळत राहील! अर्थातच, राशीच्या शुक्रकलांच्या समृद्धीतून हे घडेल. संधींचा लाभ घ्याच. प्रेमप्रकरण मार्गी लागेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक सुवार्ता कळतील. धमाल उडेल! ता. २६ ते २८ हे दिवस एकूणच उत्तम पॅकेज बहाल करणारे. 

सामाजिक बहुमान मिळेल
वृश्र्चिक :
विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नवी जीवनदृष्टी येईल. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. सामाजिक बहुमान मिळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह मौजमजेचा. प्रिय व्यक्तींचा उत्कर्ष. ता. २४ ते २६ हे दिवस भावरम्य राहतील. नवपरिणितांचा भाग्योदय. 

व्यवसायात मोठं यश
धनू :
वैयक्तिक सुवार्ता मिळतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची या सप्ताहाची सुरुवात अतिशय सुंदर राहील. तरुणांच्या ऑनलाइन मुलाखती यशस्वी होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ ते २८ हे दिवस अतिशय प्रवाही. व्यावसायिक उलाढाली यशस्वी होतील. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. 

सुवार्तांचा, प्रसिद्धीचा सप्ताह
मकर :
तुमच्या राशीला सध्या शुभ ग्रहांच्या पॅकेजचा उत्तम लाभ घडत आहे, त्यामुळे दिवाळीचा आनंद रेंगाळत राहील. अर्थातच सुवार्तांच्या पार्श्वभूमीवर! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताह पर्वणीसारखाच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धियोग. ता. २६ ते २८ हे दिवस तुमच्या राशीला अभूतपूर्व संधी देणारे. 

तरुणांची उमेद वाढेल
कुंभ :
सप्ताहातील चंद्र-शुक्रांच्या कला तुमच्या  राशीला उत्तमच राहतील. तरुणांची उमेद वाढेल. व्यावसायिकांना विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होईल. मात्र, कायदेशीर बाबी पाळाच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचे कलागुण ता. २६ ते २८ या दिवशी बहरतील. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. 

भावनोद्रेक टाळावा
मीन :
फक्त फील्डवर टिकून राहा. नका काढू धावा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना संयमी वागण्याचं फळ मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार गाठीभेटींतून फलदायी. बाकी, रेवती नक्षत्राच्या तरुणांनी भावनोद्रेक टाळावा. नवपरिणितांनी जपावं. घरातील वृद्धांशी वाद नकोत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com