
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
पूर्वतपासणी यालाच ‘स्क्रीनिंग टेस्ट’ असे म्हणतात. संपूर्ण निरोगी व्यक्तीमध्ये दडलेला आजार अथवा त्यांची पूर्वलक्षणे जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासण्या म्हणजेच स्क्रीनिंग चाचण्या. वेळेअगोदर त्याची संभाव्य कल्पना आल्यास त्यांच्यावर प्रतिबंधक उपचार होऊ शकतो आणि कोणताही आजार वाढण्यापूर्वी त्याला पायबंद घालणे अलीकडील धकाधकीच्या जीवनात योग्यच ठरते. यालाच आपल्या आरोग्याचा आरसा म्हणतात.
आपल्या देशामध्ये सर्वसाधारणपणे कोणत्याही रोगाचे निदान झाले, की मग त्यावर उपचार करून घेण्याची धडपड सुरू होते. कारण काही आजार अगदी ऐनवेळी समजतात. काही असे आजार असतात ते निदानापूर्वीपासूनच आपल्या शरीरात घर करून व दबा धरून बसलेले असतात आणि शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीत अगदी बरोबर नको त्या वेळी तोंड वर काढतात. त्यामुळेच अशा चाचण्या करून घेतल्यास योग्य त्या उपायाची दिशा ठरवता येते.
माझ्या गेल्या ३५ वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक पेशंटनी विचारलेल्या प्रश्नांना पुढे ठेवून या पूर्वतपासणीबद्दलचा आढावा घेऊ.
प्रश्न १ - डॉक्टर, काहीही त्रास होत नसल्यास या तपासणीची गरज असते का?
उत्तर - होय. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत अलीकडे स्त्रियांमध्ये याची सजगता आली आहे याला कारण उपलब्धता आणि जागरूकता.
प्रश्न २ - कोणत्या वयापासून आणि कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत. तसेच कोणत्या चाचण्या ऐच्छिक आहेत?
उत्तर - ३५ व्या वर्षांपासून सुरवात करणे योग्य.
स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला व योनीमार्गाची संपूर्ण तपासणी - सहा महिन्यांतून एकदा आवश्यक
ब्लडप्रेशर, वजन आणि स्तनांची तपासणी - वर्षातून एकदा आवश्यक प्रामुख्याने तीन तपासण्यांवर भर देणे गरजेचे आहे. गर्भाशयाच्या पिशवीची तपासणी, स्तनांची आणि लघवीच्या अनियंत्रणाची.
कुटुंबनियोजनाचा सल्ला अतिशय महत्त्वाचा.
डोळ्यांची, कानांची आणि दातांची योग्य तज्ज्ञांकडून वर्षातून एकदा करणे आवश्यक.
आहाराचा सल्ला : वजन कायमच आटोक्यात ठेवणे, ही सुखी आरोग्याची किल्लीच होय.
पुढील लेखात या चाचण्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.