स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरच्या पूर्ण तपासण्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वुमन हेल्थ - भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
सुनंदा, वय ३५. माझी पेशंट. परवा धास्तीने माझ्या  कन्सल्टिंग रूममध्ये पोचली. खूपच धास्तावलेली, गोंधळलेली, घाबरलेली होती. नेहमीप्रमाणे हसत येणारी ही आज अशी का? तर तिच्या लांबच्या नात्यातील बहीण वयाच्या ४८ वर्षी निधन पावली आणि तेही पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरने! तिला चर्चेमधून कळले, की हे सर्व तिच्या बहिणीच्या हलगर्जीपणामुळे झाले. 

डॉक्टर म्हणत होते, योग्य वेळी पूर्वतपासणी केली असती, तर कॅन्सर मुळासहित काढू शकले असते. आज तिच्या कुटुंबाला तिचा सर्वाधिक आधार वाटत होता, तेव्हा तिने स्वतःचे सुंदर जीवन गमावले होते. त्यामुळे सुनंदाची भीती योग्यच होती. तिला जाणून घ्यायचे होते, की तिने योग्य वेळी कोणती तपासणी करावी, किती वेळा आणि त्यामुळे कोणते संभाव्य धोके आपण सर्व स्त्रिया टाळू शकतो. आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार असतो. त्यामुळे आपण योग्य वेळी सावध राहणे, ही काळाची गरज आहे. 

पहिली तपासणी -
पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरची! त्याला आम्ही शास्त्रीय भाषेत ‘सर्व्हायकल कॅन्सर’ म्हणतो. प्रगतिशील देशामध्ये याची पूर्वतपासणी अत्यंत काटेकोरपणे होते. त्यामुळे या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. परंतु, आपल्या देशामध्ये अजून याचे प्रमाण जास्त असून, त्याला आपण प्रतिबंध करू शकलेलो नाही. याची कारणे आपल्या देशात नॅशनल स्क्रिनिंग प्रोग्रामची उणीव आणि लसीकरणाचा अभाव, ही आहेत. (क्रमशः)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Health Bharati Dhore Patil maitrin supplement sakal pune today