esakal | || नित्य साधनेचे महत्त्व ||
sakal

बोलून बातमी शोधा

meditation

|| नित्य साधनेचे महत्त्व ||

sakal_logo
By
पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

कर्म अत्यंत महत्त्वाची संकल्पना दृष्टीआड करून माणसे देवाला, ग्रहांना किंवा एकमेकांना दोष देत बसतात तेव्हा त्यांना का दोष द्यावा! सारी कर्मफले आहेत हे जाणून प्रखर तितिक्षेने सारे सोसत जावे. कुरकुर करू नये आणि कोणालाही दोष देऊ नये.

बँकेसमोर जाऊन ‘मदत करा, तुमच्याकडे नोटांचा ढिगारा आहे,’ असा कितीही टाहो फोडला तरी अकाउंटमध्ये कधी पैसेच न भरल्याचे कर्म असल्याने बँक एक पैसाही देत नाही आणि मग माणूस बँकेला शिव्या देत बसतो. वेळीच थोडे थोडे पैसे भरले असते तर अशी भीक मागण्याची वेळ आली नसती. परमात्मा कृपासिंधू आहे पण आध्यात्मिक बँकेत पुण्याचा खडखडाट असेल तर कशी कृपा होणार!

नित्योपासना सतत करून पापक्षय करून पुण्यसंचय अपडेट ठेवावा. बरीचशी उपासना पाप धुण्यात खर्ची पडते. म्हणून एकदम कृपा होत नाही. एक महिना नोकरी केल्यानंतरच पगार मिळतो. प्रेमभावनेने आणि दृढ श्रद्धेने उपासना करीत राहावे. उपासनेने पूर्वीचे दोष जातात आणि पुण्य शिल्लक पडू लागते जे ऐहिक सुख आणि उत्तम उत्तरगती दोन्हींचा लाभ करून देते. देह मंदिरात आणि मन संसारात असणे हे खडकावर पेरलेल्या ‘बी’प्रमाणे निष्फल आणि वांझ होते. आपापली कर्तव्ये करीत राहावे, बाकीचे देव बघेल. कडू कारले पेरले तर आंबे कसे मिळतील!

(संदर्भ : गुळवणी महाराज प्रवचने)

- पं. नरेंद्र धारणे, ज्योतिषशास्त्र अभ्यासक

हेही वाचा: सूर हरवलेला अहंकारी आलाप

हेही वाचा: मदतीचा हात हवा; अन् दृष्टिकोनातला बदलही !

loading image