

Zeni mizoram girl story
esakal
‘‘ए, ती बघ ती मुलगी!’’, ‘‘ए ती नवी मुलगी आपल्या बसमध्ये येणारे?’’, ‘‘ती अशी का दिसतीय?’’ त्या दिवशी शाळेच्या बस स्टॉपवर मुलांमध्ये अशी कुजबुज सुरू होती. हा होता मीराच्या शाळेचा बस स्टॉप आणि तिच्या स्टॉपवर एक नवी मुलगी आली होती. सगळे तिच्याकडेच पाहत होते. तिच्याविषयी बोलत होते, पण तिच्याशी मात्र कोणीच बोललं नाही. स्कूलबसमध्येही सगळे आपापल्या मित्र-मैत्रिणींबरोबर बसले. ती नवी मुलगी मात्र एकटीच बसली.
शाळेत गेल्यावर सलमा मॅडम यांनी वर्गात सगळ्यांना सांगितलं की, त्यांच्या वर्गात आजपासून एक नवीन मैत्रीण येणार आहे. अच्छा!
म्हणजे आज बस स्टॉपवर दिसलेली ती नवीन मुलगी आपल्या वर्गात आहे तर! वर्गातल्या पंचवीस मुलांच्या नजरा तिच्या दिशेने वळल्या आणि त्यांच्या डोक्यात एकच विचार आला - ‘जरा वेगळीच दिसते नाही ही!’