
कऱ्हाड : शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे १० कोटींचा निधी पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून नगरविकासने मंजूर केला. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विशेष प्रयत्न केले. या निधीतून शहरात नवीन उद्यान, क्रीडांगण, सामाजिक सभागृहे, प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण, स्मशानभूमीचा विकास आदी पायाभूत कामांना गती मिळणार आहे.