esakal | Election : माण बाजार समितीच्या 18 जागांसाठी 102 अर्ज दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Maan Market Committee

आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, शेखर गोरे यांच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली होती.

Election : माण बाजार समितीच्या 18 जागांसाठी 102 अर्ज दाखल

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Maan Taluka Agricultural Produce Market Committee) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी १०२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore), प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh), अनिल देसाई, शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखालील चार पॅनेल या निवडणुकीत मैदानात असण्याची शक्यता आहे. ६ जुलैपासून काल दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र, काल सकाळपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू होती. (102 Candidates Apply For Maan Market Committee election Satara Political News)

आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, शेखर गोरे यांच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली होती. अर्ज व्यवस्थित भरून देण्यासाठी तज्ज्ञ कार्यकर्त्यांची फौज तैनात होती. अर्ज भरण्याच्या मुदतीत एकूण अठरा जागांपैकी सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी ६२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण ७ जागांसाठी ४२, महिला २ जागांसाठी ८, इतर मागास आणि विमुक्त जाती भटक्या जमाती प्रत्येकी १ जागेसाठी प्रत्येकी ६ अर्ज आले आहेत.

हेही वाचा: उदयनराजेंमुळे साताऱ्याचे चित्र बदलले

ग्रामपंचायत ४ जागांसाठी २५ अर्ज दाखल करण्यात आले असून, त्यापैकी सर्वसाधारण २ जागांसाठी १३, अनुसूचित जाती जमाती १ जागांसाठी ६, आर्थिक दुर्बल १ जागांसाठी ६ अर्ज आले आहेत. व्यापारी मतदारसंघातून २ जागांसाठी १३ अर्ज तर हमाल मापाडीमधून १ जागेसाठी २ अर्ज दाखल झाले आहेत. आज (मंगळवार) सकाळी ११ वाजल्यापासून छाननीस सुरुवात होणार असून, सर्व अर्जांची छाननी होईपर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

102 Candidates Apply For Maan Market Committee election Satara Political News

loading image