esakal | उदयनराजेंमुळे साताऱ्याचे चित्र बदलले; उपाध्‍यक्षांचा शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

MP Udayanraje Bhosale

अलीकडच्‍या अनेक वर्षात खासदार उदयनराजे भोसले यांनी राबविलेल्‍या विकासकामांमुळे शहर बदलले असून कचराकुंडीमुक्‍त शहर ही संकल्‍पना प्रथमच सातारा पालिकेने राबवली आहे.

उदयनराजेंमुळे साताऱ्याचे चित्र बदलले

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : ओसंडून वाहणा‍ऱ्या कचराकुंड्या, पाण्‍यासाठी नळाखाली खोदलेले खड्डे, हंडा मोर्चे, गल्‍लीबोळातील अंधार हे पूर्वीचे दिसणारे चित्र अलीकडच्‍या अनेक वर्षात खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी राबविलेल्‍या विकासकामांमुळे बदलले आहे. कचराकुंडीमुक्‍त शहर ही संकल्‍पना प्रथमच सातारा पालिकेने (Satara Municipality) राबवली. कचरा संकलन (Garbage collection) करणा‍ऱ्या गाड्यांवरील गाण्‍यामुळे नगरपरिषदेचे अस्तित्व जाणवत असल्‍याचे वक्‍तव्‍य करणाऱ्यांनी शहरातील स्वच्छतेची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. त्‍यांनी केलेल्‍या सूचनांचा सकारात्‍मक आदर करत सातारा विकास आघाडी सातारकरांसाठी अधिक विकासकामे गतीमान करेल, अशी प्रतिक्रिया पालिकेचे उपाध्‍यक्ष मनोज शेंडे (Vice President Manoj Shende) यांनी पत्रकाव्‍दारे देत नाव न घेता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्‍यावर टीका केली आहे. (Vice President Manoj Shende Criticizes MLA Shivendrasinharaje Bhosale Satara Political News)

श्री. शेंडे यांनी पत्रकात म्‍हटले आहे, की गल्‍लीबोळात कचरा साठणारच नाही अशी, यंत्रणा पालिकेने उभारली आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी पालिका पहिल्‍यापासूनच सतर्क आहे. पालिकेने अनेक विलगीकरण कक्षांना मंजुरी दिली असून, खावली विलगीकरण केंद्रात पालिका पहिल्‍यापासून सेवा पुरवत आहे. शहर परिसरात इतर विलगीकरण कक्षाला सुविधा, औषधे पुरवत असल्‍यानेच पालिकेने स्‍वतंत्र कक्ष उभारलेला नाही. कात्रेवाडा येथील कक्षाला देखील पूर्ण मदत पालिका पुरवत आहे.

हेही वाचा: तुकाराम ओंबळेंच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना

याचबरोबर कोविड मृतांवर पालिका स्‍वखर्चातून अंत्‍यंस्‍कार करत आहे. पालिकेने शाहूपुरी, विलासपूरसह इतर भागात लसीकरण केंद्रे सुरु करत त्‍याठिकाणी नागरिकांना लस उपलब्‍ध करुन दिल्‍या आहेत. असे असतानाही विलगीकरण कक्षाच्‍या मुद्यावर पालिकेवर टीका करणे योग्‍य नसल्‍याचा सल्‍लाही शेंडे यांनी नाव न घेता शिवेंद्रसिंहराजे यांना दिला आहे. स्‍वच्‍छता गीतावरुन टीका करणाऱ्यांनी अप्रत्‍यक्षपणे स्‍वच्‍छतेची कबुली दिली असून, त्‍यांनीच पालिका स्‍वच्‍छतेबाबत चांगले काम करत असल्‍याचे मान्‍य केल्‍याची टिपण्णी नाव न घेता शिवेंद्रसिंहराजे यांच्‍यावर केली आहे.

Vice President Manoj Shende Criticizes MLA Shivendrasinharaje Bhosale Satara Political News

loading image