सातारा : पाटणमध्ये तब्बल 35 वर्षांनंतर सत्तांतर; राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

NCP vs Shiv sena
NCP vs Shiv senaesakal
Updated on
Summary

सोसायटीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे नेतृत्व मानणाऱ्या गटाची अनेक वर्षांपासून सत्ता होती.

ढेबेवाडी (सातारा) : सणबूर (ता. पाटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत (Sanbur Society Election) सुमारे ३५ वर्षांनी सत्तांतर घडवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाने सत्ता काबीज केली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ११ जागा मिळाल्या, तर सत्ताधारी देसाई गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील सणबूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाची अनेक वर्षांपासून सत्ता होती. या खेपेस सत्ताधारी गटाचे (कै.) शिवाजीराव देसाई शेतकरी विकास पॅनेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे सणबूर सोसायटी बचाव पॅनेलमध्ये लढत झाली. सत्ताधारी गटाचे यशवंत किसन पवार, तर प्रतिस्पर्धी पाटणकर गटाचे भगवान पिलोबा खेडेकर बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ११ जागांसाठी काल मतदान होऊन सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.

राष्ट्रवादीचे पाटणकर गटाचे (Patankar Group) विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. उत्तम सखाराम जाधव, चंद्रकांत पिलाजी जाधव, राजेंद्र आनंदा जाधव, श्रीरंग तुकाराम जाधव, लक्ष्मण जोती निकम, सुरेश गंगाराम साळुंखे, कृष्णत यशवंत साळुंखे, मायादेवी युवराज जाधव, सुवर्णा शिवाजी साळुंखे, आनंदा हरी मगरे. दरम्यान, सत्ताधारी देसाई गटाचे शिवाजी परशराम शेवाळे हे निवडून आले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गीतांजली कुंभार यांनी काम पाहिले.

Sanbur Society Election
Sanbur Society ElectionSYSTEM

नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

सणबूर सोसायटी बचाव पॅनेलच्या नवनिर्वाचित उमेदवारांचा आज माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsinh Patankar) व युवा नेते सारंग पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, माजी सभापती उज्ज्वला जाधव, सरपंच शारदा कुंभार, उपसरपंच संदीप जाधव, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, माजी सरपंच सचिन जाधव, पोपटराव खेडेकर, रामचंद्र साळुंखे, सदाभाऊ साळुंखे, सोनाजी सूर्यवंशी, विशाल जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com