सातारा : प्रतिसादाअभावी आता तिसऱ्यांदा वाळू लिलाव

जिल्ह्यात १४ ठिय्यांचा समावेश; ५ ते ६ कोटींचे उद्दिष्ट
14 sand dunes Third time sand auction
14 sand dunes Third time sand auctionsakal

सातारा : जिल्ह्यातील विविध नदीपात्रांतील तब्बल १४ वाळू ठिय्यांची लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी गौण, खनिज विभागाकडून ऑनलाइन लिलाव काढले जाणार आहेत. आतापर्यंत दोन वेळा लिलाव घेऊनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता तिसऱ्यांदा लिलाव काढण्यात येत आहेत. यातून ५ ते ६ कोटी महसूल अपेक्षित आहे. पण, वाळूचे दर आणि ठेकेदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळेस तरी प्रतिसाद मिळणार का, याची उत्सुकता आहे. मात्र, जिल्ह्याचे गौण खनिजचे उद्दिष्ट ११० कोटी आहे.

पर्यावरण विभागाच्या नियमावली, तसेच शासनाचे नवीन धोरण यामुळे जिल्ह्यातील विविध नदी पात्रांतील वाळूच्या लिलावास प्रतिसाद मिळाला नव्हता. पूर्वी वाळूचे लिलाव झाले, की हातपाटीऐवजी मशिनच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळू उपसा केला जात होता. त्यामुळे ठेकेदारांची चांदी होत होती, तसेच वाळूला दरही चांगला मिळत असल्याने लिलावाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम वाळू विक्रीतून मिळत होती. मात्र, मशिनरीच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्राची वाट लागली. अनेक ठिकाणी वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांत अनेकांना जीव गमवावे लागले होते. काही ठिकाणी नदीचे पात्रच धोक्यात आले होते.

या सर्व बाबी पर्यावरणप्रेमींनी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन काहींनी यावर निर्बंध आणण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे पर्यावरण विभागाची परवानगी असल्याशिवाय वाळू लिलावास परवानगी मिळू शकत नव्हती, तसेच हातपाटीनेच वाळू उपसा करण्याचा निर्णय झाला. एकूणच वाळू उपशाबाबत शासनाने मध्यंतरी नवीन धोरण आणले. त्यामध्ये अनेक अटीशर्ती घातल्या होत्या; पण आता हे धोरण पुन्हा एकदा शिथिल केले आहे; परंतु गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत वाळू लिलाव झाले नाहीत, तर ज्यावेळी लिलाव प्रक्रिया घेण्यात आली; पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही.

जिल्ह्याचे उद्दिष्ट व ठिय्ये...

  • गौण खनिजचे उद्दिष्ट : ११० कोटी

  • लिलाव होणारे ठिय्ये : १४

  • वाळूतून अपेक्षित महसूल : ५ ते ६ कोटी

  • हातपाटीनेच वाळू उपशास परवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com