esakal | गणेशोत्सवात साताऱ्यातून 150 जादा बस; मुंबई-पुण्यासह कोकणात जाणाऱ्यांची 'सोय'
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची धावपळ सुरु झालीय.

गणेशोत्सवात साताऱ्यातून 150 जादा बस

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2021) काळात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे State Road Transport Corporation (एस.टी) जादा बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ११ डेपोतून लांब पल्यांच्या व जिल्ह्यांतर्गत अशा एकूण १५० हून अधिक जादा बस सुटणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई (Pune Mumbai ST) व कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे, मध्यवर्ती बस स्थानकासह इतर ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे एस.टी प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गणेशोत्सवाचा मुख्य कालावधी व परतीचा प्रवास अशा पद्धतीने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन जास्तीत-जास्त बस पाठविण्यात येणार आहेत. याचबरोबर, गणेशोत्सवाच्या काळात मार्ग तपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

कोरोनाच्या काळात एस.टी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यापासून कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याने वाहतूक सुरु झाली. परंतु, सद्यस्थितीतही कोरोनाच्या भितीने प्रवाशांची कमी संख्या असल्याने आर्थिक उत्पन्नाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर गणेशोत्सव सणानिमित्त महामंडळ सर्वात जास्त आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: कास पठारला दोन दिवसांत पाच हजार पर्यटकांची भेट

सातारा-स्वारगेट मार्गावर सर्वाधिक बस

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातून सातारा-स्वारगेट मार्गावर दररोज ७६ फेऱ्या व सातारा-मुंबई मार्गावरही जास्तीत-जास्त बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून मुंबई व पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार असल्याचे एस.टी प्रशासनाने सांगितले आहे.

loading image
go to top