esakal | कास पठारला दोन दिवसांत पाच हजार पर्यटकांची भेट; पावसामुळे अनेकांची तारांबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Kas flower plateau

कास पठारावर 25 ऑगस्टपासून बुकिंग सुरू झाले आहे.

कास पठारला दोन दिवसांत पाच हजार पर्यटकांची भेट

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (सातारा) : पुष्प पठार (Kas flower plateau) कासवर पर्यटकांचा ओघ वाढतच चालला असून शनिवारी व रविवार सुट्यांचा मुहूर्त साधत हजारो पर्यटकांनी भेट दिली. आज सायंकाळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Police Ajay Kumar Bansal) यांनी सहकुटुंब कास पठाराला भेट दिली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पाच हजार पयर्टकांनी भेट दिली.

कास पठारावरील निसर्ग खूप छान असून इथे येऊन आनंद झाला, अशी प्रतिक्रिया देताना श्री. बन्सल यांनी समितीच्या कामकाजाचे कौतुक केले. कास पठारावर २५ ऑगस्टपासून बुकिंग सुरू झाले असून एक सप्टेंबरनंतर येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग (Online Booking) करून पठारावर प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत साधारणतः पाच हजार लोकांनी पठाराची पाहणी केली. कोरोनामुळे (Coronavirus) तब्बल दोन वर्षे कास पठारावरील हंगाम बंद होता. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्यामुळे हंगाम सुरू झाला. पठारावर येणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांना कोणतेही शुल्क आकारले जात नसून त्यावरील सर्व पर्यटकांना १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

Police Ajay Kumar Bansal

Police Ajay Kumar Bansal

पठारावर पर्यटकांना सोडण्यासाठी दिवसभरात चार स्लॉट करण्यात आले असून प्रत्येक स्लॉटमध्ये प्रत्येकी ७५० पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. दुपारनंतर आलेल्या पावसामुळे पर्यटकांची तारांबळ उडाली. पठारावर असणारी निवारा शेड कमी पडत आहेत. त्यामुळे पठारावर पाऊस आल्यानंतर पर्यटकांना निवाऱ्यासाठी कास पठार कार्यकारी समितीने व्यवस्था करावी, अशी अपेक्षा काही पर्यटकांनी व्यक्त केली. बसच्या माध्यमातून लोकांनी परिसरातील १२ ठिकाणांना भेटी देऊन आनंद घेतला. कास पठारावर येण्यासाठी www.kas.ind.in या वेबसाईटवर आगाऊ बुकिंग करून यावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे यांनी केले आहे.

हेही वाचा: लोकसभेनंतर महापालिका निवडणुकीत भाजपची बाजी

loading image
go to top