सातारा पालिका सभेत १५० विषय मंजूर; वार्षिक दर मंजुरीला मान्‍यता

जीवन प्राधिकरणाच्या पाणीबिल आणि त्यावरील व्याजमाफी असणाऱ्या अभय योजनेचा प्रस्तावाला तहकुबी
150 work approved Satara Municipal Council meeting Abhay Yojana Water bill Interest waiver satara
150 work approved Satara Municipal Council meeting Abhay Yojana Water bill Interest waiver sataraesakal

सातारा : सातारा पालिकेच्‍या सोमवारी झालेल्‍या प्रशासकीय सभेत १५० विषय मंजूर करण्‍यात आले. याच सभेदरम्‍यान जीवन प्राधिकरणाच्या पाणीबिल आणि त्यावरील व्याजमाफी असणाऱ्या अभय योजनेचा प्रस्तावाला तहकुबी देण्‍यात आली. सभेदरम्‍यान विकासकामांसह इतर वार्षिक दर मंजुरीच्या विषयांना मंजुरी देण्‍यात आली.सभेत थकबाकीदारांच्‍या मिळकतींवर बोजा चढविण्‍याचा महत्त्वपूर्ण विषयदेखील मंजूर करण्‍यात आला. पालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

सभेसाठी लेखापाल आरती नांगरे, आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, तसेच पालिकेच्या विविध विषय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सभेपूर्वी अतुल दिसले यांनी सभेपुढील १५१ विषयांचे वाचन केले. सभेदरम्‍यान प्राधिकरणाच्‍या अभय योजनेच्‍या विषयावर चर्चा करण्‍यात आली. चर्चेअंती हा विषय पुढील सभेपुढे मांडण्‍याचा निर्णय घेत आजच्‍या सभेत त्‍याला तात्‍पुरती तहकुबी देण्‍यात आली. सभेपुढे बहुतांश विषय वार्षिक दरमंजुरीचे होते. या विषयांना सभेत मंजुरी देण्‍यात आली.

दोन तास चाललेल्‍या सभेदरम्‍यान सांबरवाडी फिल्टर प्रकल्‍प, शहापूर पाणीपुरवठा योजना आणि कास योजना वाहिन्‍यांच्‍या कामांना देखील मंजुरी देण्‍यात आली. शहरातील खुल्‍या जागांचे खासगी विकसकाच्‍या माध्‍यमातून सुशोभीकरण करण्‍याचा, तसेच थकबाकीदारांच्‍या मिकळतींवर बोजा चढविण्‍याचा निर्णय देखील घेण्‍यात आला. शहरातील रस्‍त्‍यांची कामे व इतर विकासकामांना गती मिळण्‍यासाठीचे सर्व विषय सभेत मंजूर करण्‍यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com