
172 compassionate, 248 MPSC candidates get jobs; Minister Desai calls for people-centric administration
Sakal
सातारा : शासन गतिमान असून, प्रशासकीय कामकाज गतिमान करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. शासनाच्या धोरणाने अत्यंत सुलभपणे आपल्याला शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली आहे. याची जाणीव ठेवून चांगले काम करा. शासनाच्या कल्याणकारी ध्येय धोरणांचा सर्वसामान्य घटकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लाभ मिळवून द्या. शासन आणि जनता यामधला दुवा म्हणून काम करा. पालकमंत्री म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.