esakal | वादळी वाऱ्यात 20 लाखांवर नुकसान; कऱ्हाडला पिकांसह घरांची मोठी पडझड
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

वादळी वाऱ्यात 20 लाखांवर नुकसान; कऱ्हाडला पिकांसह घरांची मोठी पडझड

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : शहरासह तालुक्‍यात वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरीवरील पत्रे उडून निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विजेचे खांब पडून, वीज वाहिन्या तुटून महावितरणचेही मोठे नुकसान झाले. तालुक्‍यात सुमारे 20 घरांवरील पत्रे उडाले आहेत. वादळी वाऱ्याने तालुक्‍यात 20 लाखांवर नुकसान झाले आहे.

शहरासह तालुक्‍याच्या कोळे, काले, वडगाव हवेली, विंग, कोळेवाडीसह अन्य परिसरात काल रात्री वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. विजांच्या कडकडाटात मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामध्ये कऱ्हाडच्या बारा डबरे परिसरातील कचरा प्रकल्पाचा बॉयलर पडून सतीश सुभाना सकटे, हिराबाई बाळासाहेब काळे, नारायण नामदेव काळे, अनिल अरुण खिलारे, शंकर मोतिराम सावंत या सर्वांच्या घराचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले.

वीज पडून शिरगावचा शेतकरी जागीच ठार; घर बांधण्याचे स्वप्न राहिले अधूरे

बेघरवस्तीतील मेघा शंकर शिंदे यांच्या घराचे सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले. मलकापूरच्या आगाशीवनगरमधील दांगट वस्तीतील घरांचेही नुकसान झाले आहे. संजयनगर- शेरे येथील उत्तम चव्हाण, जयसिंग राजाराम चव्हाण, जयश्री बनसोडे, मनोहर मदने, संजय नामदास व महादेव मंदिर आदीचे सुमारे एक लाख 50 हजारांचे नुकसान झाले. शहरासह तालुक्‍यात वादळी वाऱ्याने महावितरणचे विजेचे खांब पडून, वीज वाहिन्या तुटून मोठे नुकसान झाले.

लईभारी! हस्तनपुरातील खडकाळ माळरानात बहरतेय वनराई; 31 हजार 250 वृक्षांना 'जीवदान'

कऱ्हाड तालुक्‍यातील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः घरांचे नुकसान मोठे आहे.

अमरदीप वाकडे, तहसीलदार

Edited By : Balkrishna Madhale

loading image