
वीज पडून शिरगावचा शेतकरी जागीच ठार; घर बांधण्याचे स्वप्न राहिले अधूरे
कऱ्हाड (सातारा) : शिवारात शेतीचे काम सुरु असताना वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाल्याची घटना शिरगावात (ता. कऱ्हाड) आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रुपेश हणमंत यादव (वय ३८) असे संबंधित ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर दादासाहेब थोरात हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी : वादळी वाऱ्यासह पावसाने आज दुपारी चारच्या सुमारास शिरगाव परिसरात हजेरी लावली. तत्पूर्वी दादासाहेब थोरात यांच्या शेतात रुपेश यादव व थोरात हे दोघे ऊस फोडणीचे काम करत होते. अचानक पाऊस सुरु झाल्याने विजांचा कडकडाट झाला. त्यादरम्यान त्या दोघांचे काम सुरुच असताना रुपेश यादव यांच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये रुपेश यादव हे जागीच ठार झाले, तर सोबत असलेले थोरात जखमी झाले. मोठा आवाज झाल्याने जवळपास शेतात असलेल्या शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने संबंधित दोघांना उपचारासाठी उंब्रजच्या रुग्णालयात दाखल केले.
लईभारी! हस्तनपुरातील खडकाळ माळरानात बहरतेय वनराई; 31 हजार 250 वृक्षांना 'जीवदान'
मात्र, रुपेश यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. श्री. थोरात यांना उपचासाठी उंब्रजमधील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांनीही मोठा धक्का बसला आहे. रुपेश यादव यांनी नुकतेच घर बांधायला काढले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By : Balkrishna Madhale
Web Title: Death Of Farmer At Shirgaon Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..