esakal | महामार्ग ओलांडण्याचे 'शॉर्टकट' ठरताहेत जीवघेणे; कऱ्हाडात तब्बल 200 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Karad Highway
महामार्ग ओलांडण्याचे 'शॉर्टकट' ठरताहेत जीवघेणे; कऱ्हाडात तब्बल 200 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : महामार्ग ओलांडण्यासाठी शासनाने मार्ग दिला असतानाही महामार्ग ओलांडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तयार केलेले शॉर्टकट त्यांच्याच जीवावर बेतत आहेत. गेल्या दोन वर्षांत शॉर्टकटने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल 200 नागरिकांना जीवास मुकावे लागले आहे. वाठार ते इंदोली फाट्यापर्यंतच्या किमान 30 किलोमीटरच्या टप्प्यात पादचाऱ्यांसह धडक दिल्याने मृत्यूची नोंद पोलिसांकडे आहे.

महामार्ग ओलांडता येऊ नये, यासाठी बांधलेला दुभाजक व त्यावर संरक्षण जाळी बांधली आहे. त्यावरून उड्या मारून, तर काही ठिकाणी ग्रील तोडून महामार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांनी शॉर्टकट शोधले आहेत. उपमार्गावर लोखंडी संरक्षण रॅलिंग बसविले आहेत. त्या लोखंडी रेलिंगचा काही भाग कापून त्यातून महामार्ग ओलांडण्याचा पर्याय नागरिकांनी शोधला आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. महामार्ग ओलांडणाऱ्यांना भरधाव वाहनांची ठोकर बसल्याच्या घटनेत अनेकांनी जीव गमावला आहे. महामार्गावर अचानक कोणी आडवा येईल, याचा अंदाज न येणाऱ्या अवजड भरधाव वाहनांनी महामार्गावर मागील दोन वर्षांत तब्बल 200 जणांना ठोकर दिली आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडण्याचा शार्टकट पादचाऱ्यांसाठी जीवावर ठरत आहे.

चर्चा तर हाेणारच; भागवत कुटुंबियांनी घातले 'स्टेला'चे डाेहाळ जेवण

महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिस व रस्ता देखभाल त्याबाबत जागृती करत आहेत. मात्र, त्याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. कोल्हापूर नाका, उंब्रज, नांदलापूर, कोयना वसाहत प्रवेशद्वार येथे अनेक अपघात झाले आहेत. जीव गमावलेल्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच आहे. अनेकदा युवक रॅलिंगवरून उडी मारून जातात. तोल न सावरल्यास ते वाहनांवर जाऊन धडकल्याच्याही घटना आहेत. भराव पुलाखालून वाहने व पादचाऱ्यांसाठी मार्ग आहेत. मात्र, त्याचा वापर बरेचसे करत नाही. नागरिकांचा अतातायीपणा जीवाशी खेळ ठरतो आहे. याबाबत जागृती केली असतानाही वेळ वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक या शॉर्टकटचा वापर करताना दिसतात; पण वेळ वाचवण्याच्या नादात अनेक जण जीवाला मुकत आहेत, हे कोणाच्याही लक्षात येत नाही.

पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

शॉर्टकटची धोकायक ठिकाणे...

कोल्हापूर नाका, उंब्रज फाटा, शिवडे फाटा, इंदोली फाटा (सर्वाधिक धोकायक), वाठार, मालखेड फाटा, पाचवड फाटा, नांदालापूर फाटा, मलकापूर फाटा, कोयना वसाहत कमान, खोडशी, वहागाव.

Edited By : Balkrishna Madhale