esakal | चर्चा तर हाेणारच; भागवत कुटुंबियांनी घातले 'स्टेला'चे डाेहाळ जेवण

बोलून बातमी शोधा

Stella
चर्चा तर हाेणारच; भागवत कुटुंबियांनी घातले 'स्टेला'चे डाेहाळ जेवण
sakal_logo
By
दीपक क्षीरसागर

कामेरी : प्राणी मग तो कोणताही असो. त्याला जीव लावला तर तो जीवाला जीव देतो हा इतिहास आहे. श्वानाने (कुत्रे) तर मानवाच्या जीवनात अढळ स्थान मिळवले आहे. प्राणी प्रेमी माणसांना तर घरातले श्वान जीव की प्राण असते. असेच जीवापाड प्रेम करणा-या अमर भागवत यांनी लाडक्या ' स्टेला'चे चक्क थाटामाटात डोहाळ जेवण घातले. अंगावर नवे भरजरी वस्त्र, बाजूलाच मांडलेली 'तीच्या' आवडीची फळे, विविध प्रकारची मिठाई अन बरेच काही. तीची हौस करण्यात काहीही कमतरता ठेवली नाही. सजलेल्या सुवासींनीनी तीचे औक्षण केले अन भागवत यांच्या लाडक्या स्टेलाचे डोहाळ जेवण नुकतेच थाटामाटात झाले.कोळेवाडी (ता.कराड) येथील अमर भागवत यांना लहानपणापासून पशूपक्ष्यांबद्दल खूप प्रेम. या प्रेमाचे रुपतांतर छंदात झाले. सध्या त्यांच्या कुटुंबात पाच श्वान आहेत. त्यातील स्टेला नावाच्या श्वानाचे नुकतेच भागवत कुटुंबियांनी डाेहाळ जेवण घातले. या डाेहाळ जेवणाची चर्चा परिसरात हाेती.

कोरोना काळात सामाजिक अंतर राखून मुक्या प्राण्याचे डाेहाेळे जेवण घालणारे अमर भागवत यांनी एखाद्या कन्येचे डोहाळे जेवण करावे अगदी तसेच स्टेलाला चक्क पाळण्यात बसवले. तिला चोळीचा आहेर केला. सर्व विधी पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. स्टेला ही १८ महिन्याच्या असून ती आई होणार आहे. भागवत कुटुंबियांना प्राणी फार आवडतात. श्वान सांभाळण्याची त्यांना फार आवड आहे. ते म्हणतात कुत्र्याला कधी कुत्रे म्हणून नये. जरी हे मुके प्राणी असले तरी ते प्रामाणिक आहेत. त्यांना तुम्ही लऴा लावला की ते तुम्हांला लावतात.

झाला निर्णय;18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी माेजावे लागणार पैसे

स्टेला, जॅानी, रोमी, स्विटी, अलेक्सा अशी नावे असलेले आमचे हे श्वान कुटुंबातील एक भाग असल्याचे भागवत यांनी नमूद केले. माझी पत्नी, दोन्ही मुलीही या सर्वांवार नितांत प्रेम करतात. कुटुंबातील सर्वांना मुक्या प्राण्याविषयी आपुलकी आहे. आम्ही त्यांना घरात कधीच बांधून ठेवलेली नाही असे सांगतानाच त्यांनी हॉलमध्येच असतात स्टेलाला हाक मारली. त्यावेळी स्टेला त्यांच्याकडे धावत आली. आज आमच्या स्टेलाचे डोहाळे जेवण होते. या निमित्त कुटुंबियांतील महिलांना तिला हळदीकुंकू लावून ओवाळले आले नंतर पाळण्यात बसवले. झोके दिले. आगामी काळात आम्ही स्विटीचेही डाेहाळे जेवणाचा कार्यक्रम करणार असल्याचे भागवत यांनी नमूद केले.

'टेस्ट लवकर केल्यामुळे दोनच दिवसांत कोरोना पळाला!'

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

Edited By : Siddharth Latkar