esakal | पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

बोलून बातमी शोधा

Maharashtra State Road Transport Corporation
पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय
sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : सातारा जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने मुंबई व पुणे मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 11 डेपोंतून केवळ जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू असून, अत्यावश्‍यक कर्मचाऱ्यांसाठी दिवसातून एक अथवा दोन फेऱ्या सुरू असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने गतवर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाउन झाल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. कोरोना काही प्रमाणात नियंत्रित आल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून वाहतूक सुरू केली होती. नोव्हेंबरनंतर एसटी आगारात प्रवाशांची संख्या वाढल्याने फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली होती. मात्र, यंदाच्या वर्षी पुन्हा फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे एसटी वाहतुकीवर परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर सुरुवातीला मुंबई व पुणे मार्गावर काही प्रमाणात वाहतूक सुरू होती. गेल्या पाच दिवसांपासून सातारा पुणे सातारा ही विना थांबा बस सेवा आणि मुंबईला जाणारी एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer

सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक व जिल्ह्यातील इतर दहा डेपोंतून राज्यभर व जिल्ह्यांतर्गत संचलन केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संचारबंदी लागू केल्याने बस स्थानकांवर शुकशुकाट आहे. एसटी प्रशासनही तालुकानिहाय केवळ सकाळ सत्रात व संध्याकाळच्या सत्रात एक फेरी सोडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिली बायको असताना दुसरीसोबत 'लग्नाची गाठ'; पिंप्रदात वडिलांनी केला मुलाचा खून

सातबारा उताऱ्यासाठी लाच घेताना तलाठी जाळ्यात; मसुरात 'लाचलुचपत'ची धडक कारवाई