

Satara Zilla Parishad to upgrade 223 schools into model institutions; focus on student learning and quality education
Sakal
सातारा: जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील २२३ शाळा मॉडेल करण्यात येत असून, या अंतर्गत शाळांना भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता व लोकसहभाग या तीन बाबींचा समावेश करून मॉडेल स्कूल बनवले जाणार आहेत. यासाठी भौतिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह मनरेगा, जलजीवन मिशन, १५ वा वित्त आयोगातील निधीची मदत घेतली जाणार आहे.