ajit pawar
sakal
जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ मध्ये झाल्यानंतर सुरुवातीची ३५ वर्षे कॉँग्रेसचे वर्चस्व होते. ग्रामीण भागातील राजकारणावर कॉँग्रेसची पकड घट्ट असताना १९९९ मध्ये कॉँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. याच कालावधीपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सलग २३ वर्षे जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. हा कालखंड केवळ सत्तेचा नसून, नेतृत्व, संघटन आणि रणनीतीचा होता.
प्रशांत घाडगे, सातारा