Wai Muncipal : वाई पालिका सभेत ३५ विषय मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wai Muncipal

Wai Muncipal : वाई पालिका सभेत ३५ विषय मंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाई : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामांच्या निविदा मंजुरीसह एकूण ३६ विषयांवर आज खेळीमेळीत चर्चा झाली. या वेळी एक विषय तहकूब ठेवण्यात आला, तर उर्वरित ३५ विषय एकमताने मंजूर करण्यात आले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. प्रारंभी स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पालिकेला ‘कचरामुक्त शहर’ म्हणून तीन स्टार पुरस्कार मिळाल्याबद्दल तत्कालीन मुख्याधिकारी, सर्व पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेल्या वाईकर नागरिकांचे अभिनंदन करणारा ठराव चरण गायकवाड यांनी मांडला. त्यास अनुमोदन देताना महेंद्र धनवे यांनी शहरातील स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी तसेच त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने व सफाई कामगारांनी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

त्यासाठी सर्व पदाधिकारी निश्चित मदत करतील. सभेत विषयपत्रिकेतील सि.स.नं. २४१० वरील व्‍हिजिटेबल मार्केट, शॉपिंग सेंटर आणि आठवडी बाजार या आरक्षणाबाबत नगररचना अधिनियम १९६६ अन्वये वाई मिशनच्या वतीने प्राप्त झालेल्या नोटिसीबाबतचा निर्णय तहकूब ठेवण्यात आला. उर्वरित सर्व विषय मंजूर करण्यात आले. यामध्ये बांधकाम विभागाकडील सिध्दनाथवाडीत गुरेबाजार झोपडपट्टीत सिध्देश्वर मंदिरालगत रस्ता काँक्रिटीकरण, क्रॉस ड्रेन तसेच कट्टा बांधकाम करणे यासाठी, कर विभागाकडील शहरातील मालमत्तांचे चतुर्थ वार्षिक सर्वेक्षण, कर मूल्यांकनासाठी संगणकीकरण व आवश्यक तांत्रिक सेवा पुरविण्यासाठी प्राप्त निविदा मंजूर करण्यात आल्या.

याशिवाय शहरात आवश्यक ठिकाणी नवीन एलईडी दिवे बसविणे, सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत सुधारित पाणी योजनेचा प्रस्ताव सादर करणे, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसाने सेवेत सामावून घेण्यासाठी पालिका आकृतीबंधातील वर्ग चारमधील अस्थायी पदे पुनरुज्‍जीवित करणे, शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल-दुरुस्ती करणे व नवीन कॅमेरे खरेदी करणे, पालिकेचा वर्धापन दिन साजरा करणे, पालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाण्यासाठी अॅक्वागार्ड मशिन बसविणे, गंगापुरी, नावेचीवाडी व सोनगीरवाडीत गटारे, संरक्षक भिंत व कट्टा बांधकाम, रस्ता डांबरीकरण अशी विकासकामे करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

या वेळी भारत खामकर, दीपक ओसवाल, प्रदीप चोरगे, संग्राम पवार, राजेश गुरव, किशोर बागुल आदींनी चर्चेत भाग घेतला. शीतल शिंदे, सीमा नायकवडी, रेश्मा जायगुडे, वासंती ढेकाणे, सुमैय्या इनामदार, सुनीता चक्के या महिला सदस्या तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी, मुकादम उपस्थित होते. कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

loading image
go to top