पोटनिवडणुकीत 36 उमेदवार बिनविरोध; 39 जागांसाठी होणार मतदान

Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionesakal
Summary

22 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.

पाटण सातारा : पाटण तालुक्यातील (Patan Taluka) ८९ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) १४० रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ३६ ग्रामपंचायतींतील रिक्त जागेतील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १६ ग्रामपंचायतींमधील ३९ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होत आहे. २२ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.

तालुक्यातील हावळेवाडी, टोळेवाडी, काळोली, कोचरेवाडी, चव्हाणवाडी (धामणी), सुपुगडेवाडी, भोसगाव, वाडीकोतावडे, शिंगणवाडी, चव्हाणवाडी (नाणेगाव), मोरेवाडी (कुठरे), मानेगावे, कवडेवाडी, आंबवणे, पिंपळोशी, दुसाळे अशा एकूण १६ ग्रामपंचायतींसाठी ३९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बोडकेवाडी, नहिंबे- चिरंबे, भुडकेवाडी, जमदाडवाडी, मारुल हवेली, टेळेवाडी, जरेवाडी, नाणेल, गाढखोप, पाबळवाडी, चाफोली, धडामवाडी, लुगडेवाडी, कोदळ पुनर्वसन, कळकेवाडी, नाणेगाव खुर्द, रामिष्टेवाडी, मस्करवाडी, डांगिष्टेवाडी, पाठवडे, मान्याचीवाडी, सुतारवाडी, शितपवाडी, सातर, पाळशी, पाणेरी, तामिणे, पाचगणी, डोंगळेवाडी, खोनोली, जाधववाडी, माथणेवाडी, चाळकेवाडी, ताईगडेवाडी, कळंबे, खिवशी या ३६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागेतील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Gram Panchayat Election
'निवडणुकीत राष्ट्रवादीनेच केला राष्ट्रवादीचा पराभव'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com