Huge Job Scam Unearthed: नोकरी लागल्याची नियुक्तिपत्रे त्याने दिली; परंतु ही प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर मागणी करूनही त्याने पैसे परत न देता फसवणूक केल्याचे पाटोळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.
सातारा: रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १९ जणांची ३८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.