
"Ambulances rush patients after 38 people suffer food poisoning from Varai flour in Vaduj region."
Sakal
कातरखटाव: नवरात्रोत्सव उपवासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या वरई पिठाच्या भाकरीमुळे खटाव तालुक्यातील वडूज परिसरात सुमारे ३८ जणांना विषबाधा झाली, तर माण तालुक्यातील गोंदवले, वाघमोडेवाडी, किरकसाल, नरवणे, शिरवली आदी गावांमध्येही काही जणांना याचा फटका बसल्याची घटना घडली. अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉ. बी. जे. काटकर हॉस्पिटल, तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य काही खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.