esakal | खंडाळा कारखान्यासाठी 43 उमेदवार रिंगणात; भाजप-राष्ट्रवादीत 'कांटे की टक्कर' I Factory Election
sakal

बोलून बातमी शोधा

Factory election 2021

या कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा या वेळी खंडित झाल्याने ही निवडक रंगतदार होणार आहे.

खंडाळा कारखान्यासाठी 43 उमेदवार रिंगणात

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची (Khandala Sugar Factory Election) अखेर मतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक होत आहे. एकूण २१ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) प्रणीत बाळसिद्धनाथ संस्थापक शेतकरी सहकार पॅनेल (Farmers Cooperation Panel) व आमदार मकरंद पाटील व व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party) पुरस्कृत खंडाळा तालुका परिवर्तन पॅनेलने निवडणूक रिंगणात आमनेसामने उडी घेतली आहे.

या कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा या वेळी मात्र खंडित झाल्याने ही निवडक रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३८ पैकी ९५ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने २१ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर थेट उतरले आहेत. खंडाळा गट १ मध्ये भाजपप्रणित पॅनेलचे शंकरराव दाजीबा गाढवे ( खंडाळा), अशोक विनायक ढमाळ (असवली), रवींद्र शिवाजी ढमाळ (अंबारवाडी) यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे चंद्रकांत मारुतराव ढमाळ (असवली), दत्तात्रय नारायण ढमाळ (असवली) व अशोक संपतराव गाढवे (खंडाळा), तसेच संतोष भुजंग देशमुख (खंडाळा) यांची ३ जागांसाठी समोरासमोर लढत देत आहेत.

हेही वाचा: 24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

शिरवळ गट दोनमध्ये भाजपप्रणित पॅनेलचे साहेबराव मारुती महांगरे (विंग), संजय नामदेव पानसरे (शिरवळ), चंद्रकांत सोपानराव यादव (मिरजेवाडी), तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे नितीन लक्ष्मणराव भरगुडे-पाटील (पळशी), विष्णू यशवंत तळेकर (शिरवळ), अनंत पांडुरंग तांबे (शिरवळ) यांची ३ जागांसाठी समोरासमोर लढत आहे. बावडा गट ३ मध्ये भाजपप्रणित पॅनेलचे विशाल अनंता धायगुडे (अहिरे), संजय धोंडीबा गायकवाड, नारायण बयाजी पवार (बावडा) यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे किसन शामराव धायगुडे (अहिरे), रमेश नारायण धायगुडे (अहिरे), विश्वनाथ गोविंद पवार (बावडा) यांची लढत होत आहे. भादे गट ४ मध्ये भाजपप्रणित पॅनेलचे महादेव बाजीराव भोसले (शिवाजीनगर), श्रीपाद विनायक देशपांडे (भादे), मनोज पोपट पवार (भादवडे), तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे ज्ञानेश्वर मुगुटराव भोसले (शिरवळ), हणमंत रघुनाथ साळुंखे (भादे) व साहेबराव मारुतराव कदम (लोणी) यांची ३ जागांसाठी लढत होत आहे.

हेही वाचा: जरंडेश्वर कारखान्यावर Income Tax ची धाड; CID चे अधिकारी फिरले माघारी

लोणंद गट ५ मध्ये भाजपप्रणित पॅनेलचे बापूराव रंगनाथ धायगुडे (खेड बुद्रुक), पुरुषोत्तम बाबूराव हिंगमिरे (लोणंद), प्रदीप नामदेव क्षीरसागर (लोणंद), तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलचे शिवाजीराव शंकरराव शेळके - पाटील (लोणंद), धनाजी गुलाब अहिरेकर (पिंपरे बुद्रुक), किसन दगडू ननावरे (अंदोरी) यांची ३ जागांसाठी लढत होत आहे. संस्था बिगर उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदारसंघात गजानन महादेव धुमाळ (करंजखोप, ता. कोरेगाव राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल) विरुद्ध संजीव शंकरराव गाढवे (खंडाळा) भाजपप्रणित पॅनेलची १ जागेसाठी लढत होत आहे. महिलांचे प्रतिनिधी मतदार संघातील दोन जागांसाठी भाजपप्रणित पॅनेलच्या अनिता शिवाजीराव भोसले (जवळे), इंदू विनायक पाटील (जवळे) विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस पॅनेलच्या शालिनी शंकरराव पवार (बावडा) व शोभा नंदकुमार नेवसे (नायगाव) यांची लढत होत आहे. अनुसूचित जाती जमातींचा प्रतिनिधी मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे रत्नकांत आनंदराव भोसले (खंडाळा) व भाजपप्रणित पॅनेलचे भरत एकनाथ जाधव (मोर्वे) यांची एका जागेसाठी लढत होत आहे.

हेही वाचा: 'भाजप नेत्याचं ऐकून 'जरंडेश्वर'वर धाड; Income Tax चं हे वागणं बरं नव्हं'

भटक्या विमुक्त जाती व जमातीचा विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ भाजपप्रणित पॅनेलचे उत्तम किसन धायगुडे (पाडळी) विरुद्ध राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे विठ्ठल जयसिंग धायगुडे (पाडळी) यांची एका जागेसाठी समोरासमोर लढत होत आहे. इतर मागास वर्गीय जाती/जमातीचा प्रतिनिधी मतदारसंघातील एका जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलचे सुरेश विठ्ठल रासकर (सुखेड) व भाजपप्रणित पॅनेलचे दिनकर शंकरराव राऊत (म्हावशी) यांची एका जागेसाठी समोरासमोर लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही गट आजपासूनच प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे हे काम पाहात आहेत. आज (ता. ८) चिन्ह वाटप होणार आहे.

loading image
go to top