esakal | कोरोनाला आळा घालण्यासाठी पळशीत 100 टक्के लसीकरण; पालकमंत्र्यांकडून कौतुक

बोलून बातमी शोधा

Vaccination
कोरोनाला आळा घालण्यासाठी पळशीत 100 टक्के लसीकरण; पालकमंत्र्यांकडून कौतुक
sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (सातारा) : कोरोनाला आळा घालण्यासाठी पळशीकरांनी केलेले प्रयत्न व घेतलेली दक्षता स्तुत्य आहे. (कै.) लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त लाभार्थींना 100 टक्के लसीकरण करणारे तालुक्‍यातील पहिले गाव ठरले. हा आदर्श असून, यापुढेही ग्रामस्थांनी अशीच दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

पळशी (ता. खंडाळा) येथे (कै.) लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, नारायणपूरचे नारायण महाराज, नितीनकुमार भरगुडे-पाटील, खंडाळ्याचे माजी सभापती रमेश धायगुडे आदी उपस्थित होते. राज्यमंत्री देसाई म्हणाले,"" पळशी ग्रामस्थांचे पाणलोट क्षेत्राचे काम, कोरोना लसीकरण व ग्रामपंचायतीने घेतलेली दक्षता कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या काळामध्ये विविध व्यवसाय बंद पडले आहेत. या सगळ्यावर मात करण्यासाठी शासनाने सुमारे आठ कोटी जनतेला एक महिना मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व समाज घटकांनी शासनाने केलेले आदेश, सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.''

अवकाळी पावसाने तारळे, म्हसवडला झाेडपले; कुकुडवाड, साता-यात हलक्या सरी

या वेळी सरपंच हेमाताई गायकवाड, उपसरपंच एकनाथराव भरगुडे, सदस्य गजानन भरगुडे, कविता राऊत, सुजित दगडे, नूतन चव्हाण, नवनाथ भरगुडे, कमल भोसले, माधुरी गोळे, ग्रामसेवक नंदकुमार यादव, आशितोष भरगुडे-पाटील, अमोल पाटील, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, पाणलोट समितीचे अध्यक्ष राजेंद्र भरगुडे आदी उपस्थित होते. प्रारंभी 45 वर्षांवरील सुमारे 200 लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून 100 टक्के लाभार्थी म्हणजे 982 जणांचे लसीकरण पूर्ण केले.

Edited By : Balkrishna Madhale