Satara News:'आजी रागावली अन् चिमुरडा घरातून निघून गेला'; रागाच्‍या भरात चालवली ५० किलोमीटर सायकल, रिक्षाचालकाचे प्रसंगावधान

Grandma’s Anger Sends Boy Pedalling 50 km: रिक्षाचालक प्रवीण चव्हाण खोडशीहून वनवासमाचीकडे जात असताना त्यांची नजर सायकलवरील मुलाकडे गेली. त्यांना संशय आल्‍यावर त्यांनी आपले वाहन बाजूला घेऊन त्याच्याशी संवाद साधला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
A missing boy who cycled 50 km after a family dispute was safely rescued by a quick-thinking auto driver in Solapur.
A missing boy who cycled 50 km after a family dispute was safely rescued by a quick-thinking auto driver in Solapur.Sakal
Updated on

-तानाजी पवार

वहागाव: किरकोळ कारणावरून आजी नऊ वर्षाच्‍या नातवावर ओरडल्‍याचे निमित्त झाले आणि त्‍याच रागात त्‍याने रविवारी भरदुपारी घर सोडले. ऊन-पावसाची तमा न बाळगता त्‍याने सायकलवर कोल्‍हापूर जिल्ह्यातील मूळ गावी जाण्‍याचा विचार केला. एवढेच नव्‍हे तर त्‍या रागाच्‍या भरात तो एक-दोन किलोमीटर नव्‍हे, तर तब्‍बल ५० किलोमीटर सायकल चालवत कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाचीपर्यंत पोहोचला. तेव्‍हा मात्र रिक्षाचालकाच्‍या प्रसंगावधानाने व पोलिसांच्‍या तत्‍परतेने तो सापडला अन्‌ नातेवाइकांचा जीवच जणू भांड्यात पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com