yashwantrao chavan and principal ganpatrao kanse
yashwantrao chavan and principal ganpatrao kansesakal

Ganpatrao Kanse : ५०० व्याख्यानातून यशवंत विचारांचा जागर; प्राचार्य गणपतराव कणसे यांचा अनोखा उपक्रम

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची उद्या (मंगळवारी) १११ वी जयंती आहे. त्यापार्श्वभुमीवर प्राचार्य कणसे यांनी यशवंतराव यांच्या विचारांची गेल्या १० वर्षात केलेल्या जागराची माहिती दिली.

एका छोट्याशा खेडेगावात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक युवक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा कणखर संरक्षणमंत्री कसा होतो या उत्सुकतेपोटी मी त्यांचे कृष्णाकाठ हे पुस्तक वाचले. परिस्थीतीचे चटके सोसत त्यांनी आपल्या आईने लहानपणी दिलेल्या संस्कारावरच एवढी मोठी मजल मारल्याचे माझ्या लक्षात आले.

त्यातुन प्रेरणा घेवुन १२ मार्च २०१३ साली मी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या विचारांचा जागर तरुणांईत करायचे ठरवुन यशवंतराव चव्हाण संस्काराचा अमृतकुंभ या विषयावर १०० व्याख्याने देण्याचा संकल्प केला. जन्मशताब्दीच्या एकाच वर्षात मी तब्बल २०१ व्याख्याने देवुन पहिली ते पदवी पर्यंतच्या पश्चिम महाराष्ट्रातील लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत यशवंतरावांचे विचार, त्यांचे संस्कार पोहवचले, असे मोठ्या अभिमानाने निवृत्त प्राचार्य गणपतराव कणसे सांगत होते. गेल्या अकरा वर्षात ५०० हुन अधिक व्याख्याने दिल्याचेही त्यांनी नमुद केले.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची उद्या (मंगळवारी) १११ वी जयंती आहे. त्यापार्श्वभुमीवर प्राचार्य कणसे यांनी यशवंतराव यांच्या विचारांची गेल्या १० वर्षात केलेल्या जागराची माहिती दिली. सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण कोणाचाही आधार नसताना, कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसताना एवढ्या पदापर्यंत पोहचतो कसा ? हा प्रश्न त्यांना पडला. त्यावरुन त्यांनी यशवंतरावांचे कृष्णाकाठ हे पुस्तक वाचुन काढले.

त्यातुन त्यांनी हा माणुस संस्कारातुन उच्च पदावर पोहचला असल्याचे उमगले. त्याचरदम्यान त्यांचे २०१३ साली जन्मशताब्दी वर्ष होते. यशवंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाड (जि.सातारा) येथील कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी ते अभिवादनासाठी गेले. तेथे गेल्यावर त्यांच्या आपण यशवंतरावांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जन्मशाताब्दी वर्षात किमान १०० व्याख्याने देण्याचा संकल्प करुया असा विचार त्यांच्या डोक्यात आला.

त्यानुसार त्याचा प्रारंभ त्यांनी यशवंतरावांचे जन्मगाव असलेल्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथुन केला. तेथुन प्राचार्य कणसे यांच्या व्याख्यानांचा प्रवास सुरु झाला. त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांतील लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत यशवंतरावरांच्या संस्काराच्या विचारांचा अमृतकुंभ पोहचवण्याचे काम केले.

त्याव्दारे त्यांनी यशवंतराव यांचे बालपण, त्यांची हलाखीची परिस्थिती, त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार, त्यांचे कऱ्हाडमधील टिळक हायस्कुमध्ये झालेले शालेय शिक्षण, त्यांचे मित्र, त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत घेतलेली मारलेली मजल याचे विवेचन करुन त्यांच्यामध्ये यशवंतरावांचे विचार रुजवण्याचे काम केले. प्राचार्य कणसे यांनी आपल्या अमोघ वाणीतुन यशवंतरावांचे विचार गावोगावी पोहचवण्याबरोबरचं एकाच वर्षात तब्बल २०१ व्याख्याने दिली.

त्यातील ५० वे व्याख्यान यशवंतराव यांच्या आईच्या नावाने कऱ्हाड येथे असलेल्या विठामाता हायस्कुलमध्ये दिले. १०० वे व्याख्यान यशवंतराव ज्या शाळेत शिकले त्या टिळक हायस्कुलमध्ये दिले. त्यांच्या व्याख्यानांची नोंद लिम्का बुक ऑफ वल्ड रेकॉर्डने घेवुन त्यांना त्यांच्या कामाची पोहोच पावतीही दिली.

यशवंतरावांवरील पुस्तकाची निर्मीती

प्राचार्य कणसे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर जे व्याख्यानांच्या माध्यमातुन मंथन केले. त्याचे पुढे पुस्तकात रुपांतर करण्यात आले. त्याला खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रस्तावना दिली आहे. त्यांच्या यशवंतराव चव्हाण संस्काराचा अमृकुंभ या पुस्तकाचे प्रकाशन माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमात दिमाखात करण्यात आले.

प्राचार्य कणसेंची अशीही समाजिक बांधीलकी

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर वाटचाल करणाऱ्या प्राचार्य कणसे यांनी सामाजीक बांधीलकीतुन कऱ्हाड येथील बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या १० वर्षापासून दरवर्षी १२ मार्चला यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान आणि तेथील सर्व विद्यार्थ्यांना ते जेवण देण्याचा उपक्रम राबवत आहेत.

त्याचबरोबर त्यांनी २०१४ पासून यशवंतरावांचे विचार तेवत ठेवण्यासाठी प्राचार्य कणसे यांनी यशवंतरावांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रे, ओंड, स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या तांबवे आणि सैदापूर येथील शाळांना रोख रक्कम डिपॉझीट म्हणून दिली आहे. संबंधित शाळांत १२ मार्चच्या अगोदर निबंध व वत्कृत्व स्पर्धा घेतल्या जातात. त्यातील विजेत्यांना त्या डिपॉझीटच्या पैशांतुन पुस्तक आणि प्राचार्य कणसे यांच्याकडून प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दरवर्षी दिली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com