esakal | 'कोयना' आता जगाच्या नकाशावर; पर्यटनासाठी शासनाकडून 71 लाखांचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

दोन वर्षापासून कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे कोमेजून गेलेला कोयना परिसर पर्यटकांनी गजबजू लागला आहे.

'कोयना' आता जगाच्या नकाशावर; पर्यटनासाठी शासनाकडून 71 लाखांचा निधी

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : दोन वर्षापासून कोरोनाच्या (Coronavirus) जागतिक महामारीमुळे कोमेजून गेलेला कोयना (Koyna Dam) परिसर पर्यटकांनी गजबजू लागला आहे. राज्य शासनाकडून कोयना विभागात पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र (Police Training Sub-Center) व राज्य आपत्ती बचाव दल पथक (State Disaster Rescue Squad) या बहुउद्देशीय प्रकल्पाबरोबर कोयना पर्यटनाच्या (Koyna Tourism) विकासासाठी 71 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवासा सिटीप्रमाणे कोयनानगरचा विकास करून हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ (International Tourist Destination) म्हणून उदयास आणण्याचे काम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांच्या संकल्पनेतून होत आहे. (71 Lakh Sanctioned For Koyna Tourism Development bam92)

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर (Mini Kashmir) व पर्यटकांसाठी विकेंड डेस्टिनेशन असणारे कोयनानगर पश्चिम घाटाच्या (Koynanagar West Ghat) सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसले आहे. नयनरम्य असणारे थंड हवेचे हे ठिकाण अल्पावधीतच पर्यटन पंढरी म्हणून उदयास आले आहे. जगप्रसिध्द कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प, नयनरम्य नेहरु स्मृती उद्यान, ओझर्डे धबधबा (Ozarde Falls), कोयना अभयारण्य (Koyna Sanctuary) ही पर्यटकांची आकर्षण आहेत. समृध्द जंगलाचे प्रतिक असणाऱ्या कोयनेच्या घनदाट जंगलाची भुरळ सर्वांना आहे. त्यामुळेच हे जंगल यूनोस्कोच्या जागतिक नेटवर्क ऑफ बायो स्फिअर रिझर्व्हरचा मोठा भाग बनले आहे.

हेही वाचा: फिरायला जायचा प्लॅन आहे? 'या' ठिकाणांना आवर्जुन भेट द्या

कोयना धरणाच्या दहा किलोमीटर परिसरात असणारे प्रेक्षणीय ठिकाणे विकसीत करुन कोयना पर्यटनाला पर्यटन पंढरी बनवण्यासाठी कोयना पर्यटनाचा आराखडा तयार केला आहे. कोयना पर्यटनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा देवून त्या माध्यमातून 28 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. सध्या कोयना पर्यटनाच्या विकासासाठी 71 लाख रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. या माध्यमातून कोयनानगर येथे थ्रीडी कारंजा, नेहरू उद्यान सुशोभिकरण हिरकणी कक्ष व पर्यटन अनुषंगाने विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

71 Lakh Sanctioned For Koyna Tourism Development bam92

loading image