
"Government sanctions ₹7.5 crore for exhibitions, adventure sports promotion, and Save the Lake campaign."
Sakal
सातारा: नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या साडेतीन टक्के निधी नावीन्यपूर्ण योजनेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यावर्षी नावीन्यपूर्ण योजनांसाठी तब्बल साडेसात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आता यातून विज्ञान प्रदर्शने, साहसी खेळांचे आयोजन, अनाथ मुलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, प्राथमिक शाळेतील प्रयोगशाळांचे बळकटीकरण, लेक वाचवा अभियान, गावचा झोन प्लॅन सर्व्हे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कृषी प्रदर्शने, तीर्थस्थळांची माहिती देणारे पोर्टल तयार करणे आदी कामे घेता येणार आहेत. यातून तीन कोटींपर्यंतची कामे होणार आहेत. एका वर्षात केवळ चार ते पाच प्रकारच्या नावीन्यपूर्ण योजना राबवता येणार आहेत.