माणला खरिपाच्या ९० टक्के पेरण्या

पिकांसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता; ३३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली
Farmer-Kharip-Crop
Farmer-Kharip-Cropsakal

गोंदवले - पावसाच्या पुरेशा ओलीवर माणमध्ये खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी ३३ हजार सातशे हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी झाली आहे. तालुक्यात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी या पिकांसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. अल्प पर्जन्यमान असलेल्या माणमध्ये खरीप हंगामावर शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे.

जूनच्या दरम्यान भागात होणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर खरिपातील बाजरी, मका यासह कडधान्यांची पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा कल असतो. यंदा वळिवाचा पाऊस पुरेसा झाला नसला तरी, जूनमध्ये हजेरी लावलेल्या पावसावर खरिपासाठी योग्य वातावरणनिर्मिती झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. तालुक्याचे खरीप हंगामातील ३७ हजार ७४७ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ३३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रावर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

बाजरी पिकासाठी ३१ हजार १७४ हेक्टर लागवडयोग्य क्षेत्रापैकी २१ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मका पिकासाठी ३४६७ हेक्टर लागवडयोग्य क्षेत्रापैकी २६५० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. याशिवाय ७७७४ हेक्टर क्षेत्रावर तूर, उडीद, मूग, मटकी, घेवडा, वाटाणा आदी कडधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. भाजीपाल्यासाठी लागवडीयोग्य असलेल्या १९५० हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १०७३ हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये १७८० हेक्टरमध्ये कांदा पिकाची लागवड केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com